हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर न्यायालयात शरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28 mins ago
हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर न्यायालयात शरण

पणजी : उच्च न्यायालयाने (High Court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर आज गुरुवारी  हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर म्हापसा न्यायालयात शरण आला आहे. हणजूण पोलिसांकडून (Police) अटक होण्याची शक्यता आहे. 

काल बुधवारी उच्च न्यायालयाने रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. गोवास्थित (Goa) मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. आशिष चव्हाण यांनी यासंदर्भातील आदेश दिला होता. माजी सरपंच रोशन रेडकर पंचायत कर्मचारी व संबंधितांवर प्रभाव टाकण्याच्या पदावर होता. त्यामुळे तो साक्षीदारांना धमकावू शकतो किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकून पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू शकतो. त्याला ज्यावेळी चौकशीसाठी बोलावले होते, त्यावेळी जमाव करून तपासात अडथळा आणला होता, असे निरीक्षण नोंदवून बर्च क्लबमधील अग्न‌ितांडव प्रकरणी हडफडे नागवाचे तत्कालीन सरसंप रोशन रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. 

पोलीस तपासात आणला होता अडथळा

७ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी रोशन रेडकर याला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावले होते. त्यावेळी सुमारे १०० लोकांचा जमाव जमवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा व तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सरकारने पक्षाने ठेवला होता. 

दरम्यान, पोलीस आता त्याला अटक करण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा