
पणजीः नगरविकास खात्याने (Urban Development Department) पणजी महानगरपालिकेच्या (Panjim Corporation) निवडणुकीसाठी (Election) पणजी शहराचा प्रभाग फेररचना मसुदा जारी केला आहे. खात्याने या मसुद्यात सुधारणा करण्यासाठी सूचना मागवल्या आहेत.
नगरविकास खात्याने बुधवारी परिपत्रक जारी करून पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांचा फेररचना मसुदा प्रसिद्धीस आणला आहे. खात्याने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेप्रमाणे पुढील निवडणुकीसाठी शहराची संख्या आणि सीमा याविषयी तपशील या मसुद्यात दिला आहे.
हा मसुदा २१ ते २९ जानेवारी, २०२६ पर्यंत रविवारी आणि सार्वजनिक सुट्टी सोडून इतर सर्व कामाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत मामलेदार, तिसवाडीच्या कार्यालयांत तसेच पणजी महानगरपालिका कार्यालयांत सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध असणार. या काळात नागरिकांकडून मसुदया संबंधीत आपल्या सूचना, बदल वा दुरुस्त्या सादर करण्याचे आवाहन केले आहे. मामलेदार, तिसवाडी, पणजी येथे सूचना करता येतात; असे नगरविकास खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.