ऑटीझमग्रस्त अलखसह सृजन करणार मांडवी पोहून पार!

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th April, 07:44 pm
ऑटीझमग्रस्त अलखसह सृजन करणार मांडवी पोहून पार!

पणजी : येथील दोन जुळी भावंडे अलख व सृजन देसाई (वय ८ वर्षे) रविवार, दि. १४ एप्रिल रोजी सकाळी मांडवी नदी पोहून पार करणार आहेत. पोहण्याची सुरुवात रेईश मागुस किल्ल्यापासून पणजी जिमखाना मैदानापर्यंत सकाळी ९ ते १०.३० यावेळेत होणार आहे.

अलख देसाई हा ऑटिझम ग्रस्त बालक असून प्रशिक्षक दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पोहण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. त्याला पोहणे आणि चित्र काढण्यात रस आहे. पालक केदार देसाई आणि सिद्धी उपाध्ये यांनी प्रत्येकाने या मुलांच्या यशाचे साक्षीदार व्हावे आणि अलख आणि सृजन देसाई या जुळ्या भावांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे.