हरमल परिसरात विजेचा लपंडाव सुरू

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
07th April, 06:40 pm
हरमल परिसरात विजेचा लपंडाव सुरू

हरमल : परिसरात वीज खात्याचा कारभार बेभरवशी बनला असून, अर्धा - पाऊण तास वीज गायब होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. व्यावसायिकांनाही नुकसान सोसावे लागत आहे.
गेल्या तीन दिवसांत दोन वेळा अधूनमधून वीज नसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या ग्राहकांनी संताप व्यक्त केला. दुपारी तीन वाजता गायब झालेली वीज तासभर आली नसल्याने वीज खात्याचा भोंगळ कारभारामुळे जनतेत नाराजी पसरली. मंत्र्यांकडून २४ तास वीज पुरवठा करण्याच्या घोषणा केल्या जातात. विजेची भरमसाठ शुल्क आकारणी केली जाते. मात्र, पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याने वीज ग्राहक टोनी डिमेलो यांनी नाराजी व्यक्त केली.

भूमिगत वीज पुरवठा कुचकामी
मांद्रे मतदारसंघात भूमिगत वीज वाहिन्यांची कामे ९० टक्के पूर्ण झाल्याचे समजते. देऊळवाडा भागात काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. अशा स्थितीत वीज पुरवठा खंडित होणे म्हणजे हलगर्जीपणा असल्याचे ग्राहकांनी सांगितले.             

हेही वाचा