कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, १ जवान शहीद, मेजरसह ४ जखमी

जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडाच्या माछिल सेक्टर येथे शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर एका मेजरसह ४ लष्करी जवान जखमी झालेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th July, 12:09 pm
कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, १ जवान शहीद, मेजरसह ४ जखमी

जम्मू काश्मीर :  जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात मेजर आणि इतर चार जवान जखमी झाले आहेत. चकमकीत जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. मच्छल सेक्टरजवळ ही चकमक झाली.2 jawans injured in terrorist attack in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मिरात  3 जागी एन्काउंटर, कुपवाड्यात 2 अतिरेकी ठार: डोडा जंगलात दहशतवाद्यांनी  अस्थायी कॅम्पवर ...

पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचरांना मिळाली होती

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराचे जवान कमकारी भागात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. कुपवाडा येथील कमकारी भागात पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून जाण्याची शक्यता आहे. जवानांना जंगलात पाठवून शोधमोहीम सुरू आहे.

याआधी लान्स नाईक सुभाष कुमार शहीद झाले होते

याआधी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील कोवुत भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले नॉन-कमिशन्ड ऑफिसर दिलावर सिंह यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार केले. याआधी मंगळवारी पुंछमध्ये चकमक झाली होती, ज्यात लान्स नाईक सुभाष कुमार शहीद झाले होते.

हेही वाचा