२०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये शाहरुख खान ९२ कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने ६६ कोटी रुपयांचा आयकर जमा केला असून तो क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींमध्ये अव्वल आहे.
नवी दिल्ली: फॉर्च्युन इंडियाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार ९२ कोटींचा कर भरणा करणाऱ्या शाहरुख खानने या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्रीडा क्षेत्राचा विचार करता विराट कोहली या बाबतीत सर्वात पुढे आहे. विराटने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ६६ कोटी रुपयांचा आयकर जमा केला आहे.
साऊथचा सुपरस्टार थलपती विजय दुसऱ्या स्थानावर तर अमिताभ बच्चन चौथ्या स्थानावर आहे.
फॉर्च्युन इंडियाने जाहीर केलेल्या करदात्यांच्या यादीत दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय जोसेफचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८० कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक सलमान खानचा आहे, त्याने ७५ कोटींचा कर भरला आहे. त्याचवेळी, चौथा क्रमांक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आहे आणि त्यांनी या कालावधीत ७१ कोटी रुपये कर म्हणून जमा केले आहेत.
अजय देवगण आणि कपिल शर्मा देखील बॉलिवूडमधील टॉप-१० मध्ये आहेत
कर भरण्याच्या बाबतीत बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण पाचव्या स्थानावर आहे. त्याने एकूण ४२ कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्यांच्यानंतर रणबीर कपूरने ३६ कोटींचा कर भरला असून तो सहाव्या क्रमांकावर आहे, हृतिक रोशन २८ कोटींसह सातव्या, कपिल शर्मा २६ कोटींसह आठव्या, करिना कपूर २० कोटींसह नवव्या स्थानी आणि शाहिद कपूरने व मल्याळम सुपरस्टार मोहन लालने १४ कोटी भरले आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन १४ कोटींसह दहाव्या स्थानावर आहे. यानंतर कियारा अडवाणीने १२ कोटी रुपये, कतरिना कैफने १२ कोटी रुपये,पंकज त्रिपाठीने ११ कोटी आणि आमिर खानने १० कोटी रुपये कर म्हणून जमा केले आहेत.
स्पोर्ट्स सेलिब्रिटींमध्ये एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वात जास्त कर भरणाऱ्या क्रीडा सेलिब्रिटींमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ३८ कोटी रुपयांचा कर भरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही २८ कोटींचा कर भरणा केला असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. दादा सौरव गांगुलीने २३ कोटींचा कर भरला असून तो चौथ्या स्थानावर आहे तर, हार्दिक पंड्या १३ कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे आणि ऋषभ पंत १० कोटी रुपयांसह सहाव्या स्थानावर आहे.