नेपाळपाठोपाठ आता अमेरिकेतही मोठी विमान दुर्घटना;अनेकांचा मृत्यू,जंगलात भीषण आग

नेपाळपाठोपाठ आता अमेरिकेतही मोठा विमान अपघात झाला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृतांचा आकडा अद्याप उघड झालेला नाही. मात्र अपघाताच्या ठिकाणी प्रचंड आग आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. विमान जंगलात कोसळल्यामुळे जंगलात भीषण आग लागली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th July, 12:59 pm
नेपाळपाठोपाठ आता अमेरिकेतही मोठी विमान दुर्घटना;अनेकांचा मृत्यू,जंगलात भीषण आग

जिलेट (वायोमिंग) : नेपाळपाठोपाठ आता अमेरिकेतही मोठा विमान अपघात घडल्याची बातमी समोर येत आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की अपघातस्थळी जंगलात भीषण आग लागली. अशा परिस्थितीत येथे अनेकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. हा अपघात अमेरिकेच्या वायोमिंग राज्यात घडला. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी उशिरा रात्री ही माहिती दिली. यापूर्वी नेपाळमध्येही धावपट्टीवर घसरल्याने एक मोठा विमान अपघात झाला होता, यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता. Plane crashes with 7 people aboard near Gillette, Wyoming

दरम्यान कॅम्पबेल काउंटीच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सांगितले की, विमान वायोमिंगच्या सीमेजवळील जिलेट शहरावरून उड्डाण करत असताना दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेमधील मृतांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कॅम्पबेल काउंटी अंडरशेरिफ क्वेंटिन रेनॉल्ड्सने दिलेल्या माहितीनुसार,अपघातापूर्वी पायलटने विमानात काहीतरी गडबड झाली असल्याचा आपत्कालीन संदेश पाठवला होता. Confirmed fatalities' in plane crash north of Gillette | Local News |  gillettenewsrecord.com

रेनॉल्ड्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील लोकांनी नंतर आपत्कालीन यंत्रणेला कॉल केला आणि अपघात स्थळाजवळ धूर निघत असल्याची माहिती दिली. येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या अपघातामुळे जिलेटच्या आसपासच्या जंगलात मोठी आग लागली. विमानाच्या साहाय्याने परिसरात पाण्याची फवारणी करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने अपघाताची चौकशी करण्यासाठी एक टीम घटनास्थळी पाठवली आहे.Plane Crash: बड़ा विमान हादसा, एक और प्लेन क्रैश, कई लोगों की मौत - plane  crashed us fire in forest campbell county gillette-mobile

हेही वाचा