अहान बेराचे कानपूर ओपन स्क्वॅशमध्ये यश

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th March, 12:36 am
अहान बेराचे कानपूर ओपन स्क्वॅशमध्ये यश

पणजी : दाबोळी येथील नेव्ही चिल्ड्रन स्कूलमधील १६ वर्षीय विद्यार्थी अहान बेरा याने राष्ट्रीय सर्किट टीएसएच कानपूर ओपन स्क्वॉश स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून गोवा स्क्वॅशचा गौरव केला.
राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत अहान बेराने उपांत्य फेरीतील सामन्यात दुसऱ्या मानांकित खेळाडूवर सरळ सेटमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती. या सामन्यात दुखापत झाल्यानंतरही त्याने फायनलमध्ये उत्साहाने लढा दिला. अखेरीस या सामन्यात त्याला ११-४, ११-३, ११-८ अशा गुणांच्या आधारे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.