फर्मागुडी इंजिनिअरिंग कॉलेज विजयी

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट महिला चॅम्पियनशिप

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th March, 12:35 am
फर्मागुडी इंजिनिअरिंग कॉलेज विजयी

पणजी : गोवा विद्यापीठाची आंतर महाविद्यालयीन क्रिकेट महिला चॅम्पियनशिप ताळगाव गोवा विद्यापीठाच्या मैदानावर सुरू आहे. चौथ्या दिवशीच्या सामन्यात नारायण झांट्ये कॉलेज डिचोली विरुद्ध गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फर्मागुडी यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यात इंजिनिअरिंग कॉलेज फर्मागुडीने ५३ धावांनी विजय मिळविला. 

इंजिनिअरिंग कॉलेज फर्मागुडीने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत २ बाद ११५ धावा केल्या. रिया नाईकने नाबाद ४९ धावा केल्या. तर गोलंदाज  विनेशा नाईकने ३२ धावांत २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात खेळताना नारायण झांट्ये कॉलेज डिचोलीने १० षटकांत ८ गडी बाद ६२ धावा केल्या. सानिका धुरीने सर्वाधिक १३ (१५) धावा केल्या. तर फर्मागुडीची गोलंदाज रिया नाईकने  २/०९ आणि इवनीत कौर २/१८ यांनी विशेष कामगिरी केली.