एलन मस्क यांनी युजर्सना दिले मोठे गिफ्ट, आले सर्वात दमदार फीचर...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th February 2024, 10:33 am
एलन मस्क यांनी युजर्सना दिले मोठे गिफ्ट, आले सर्वात दमदार फीचर...

न्यूयॉर्क : एलन मस्क यांनी X युजर्सना व्हॉट्स ॲपला धक्का देत दमदार फीचर लाँच केले आहे. यात युजर्सना X वर व्हॉईस आणि व्हीडीओ कॉल करू शकतात. विशेष बाब म्हणजे X ला कॉल करण्यासाठी यूजर्सला फोन नंबर टाकावा लागणार नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी X च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही.

सुरुवातीला हे फीचर केवळ प्रीमियम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. आता ते सर्व युजर्ससाठी खुले करण्यात आले आहे. X चे हे फिचर व्हॉट्स ॲपला जबर टक्कर देणार आहे. X चे अभियंता एनरिक बॅरेगन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या फीचरची माहिती दिली आहे. कंपनीने नॉन-प्रिमियम युजर्ससाठी हळूहळू ऑडिओ आणि व्हीडीओ कॉलिंग फीचर्स लाँच करत आहे. नवीन अपडेटच्या आगमनाने युजर्स आता ते फॉलो करत असलेल्या खात्यांवरून किंवा त्यांच्या X ॲड्रेस बुकमधील संपर्कांमधून कॉल प्राप्त करू शकतात, असे बॅरेगन यांनी नमूद केले आहे.

कॉल करण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे

कॉलिंगसाठी दोन्ही युजर्सनी कधीतरी एकमेकांशी बोलणे आवश्यक आहे. दोन युजर्समध्ये एकच DM शेअर केला असेल तर ते एकमेकांना कॉल करू शकतील. यामध्ये युजर्सना खालील खात्यांवरून आणि प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या कोणत्याही युजर्सकडून कॉल प्राप्त करण्याचा पर्याय मिळेल.

X वर असे करा कॉल

* सर्वप्रथम, तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर X ॲप उघडा आणि DM विभागात जा.

* बोलणे सुरू करण्यासाठी, फोन आयकॉनवर क्लिक करा आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल निवडा. हे केल्यानंतर, रिसीव्हरला एक सूचना मिळेल की आपण त्यांना कॉल करू इच्छिता.

* वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला कोण कॉल करू शकतो हे देखील तुम्ही सेट करू शकता.

* कंपनीने याआधी हे फीचर फक्त iOS आणि X प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी आणले होते.