रजत मयेकर यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचे विजेतेपद

मिस्टर गोवा २०२४ राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th February, 12:28 am
रजत मयेकर यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचे विजेतेपद

पणजी : मिस्टर गोवा २०२४, गोवा बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे महाकाल फिटनेस स्टुडिओ आणि युनायटेड स्पोर्ट्स क्लब-म्हार्दोळ यांच्या संयुक्त विद्यमाने म्हार्दोळ येथे आयोजित बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये इन्फिनिटी जिम मडगावचे रजत मयेकर यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचे विजेतेपद पटकावले.
सदर राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा २३ रोजी फुटबॉल मैदान, म्हार्दोळ येथे आयोजित करण्यात आली होती. बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो आणि ७५ किलोपेक्षा जास्त आणि पुरुष फिजिक चॅम्पियनशिप आणि इंटर कॉलेजिएट बॉडी बिल्डिंग, मेन्स फिजिक चॅम्पियनशिप अशा ६ प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आली होती. चॅम्पियनशिपमध्ये एकूण ९० खेळाडू सहभागी झाले होते.
बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
इंटर कॉलेजिएट (१७० सेमीपेक्षा जास्त) : पहिला- प्रतीक गावस, डॉन बॉस्को कॉलेज, दुसरा- रिदम सबनीस, जीव्हीएमएस कॉलेज, तिसरा- सैदत्त कोळवेकर, धेंपे कॉलेज. (१७० सेमीपर्यंत) : पहिला- आदर्श परवार, गोवा पॉलिटेक्निक पणजी, दुसरा- श्रीकृष्ण बांदेकर, धेंपे कॉलेज, तिसरा- संगप्पा गाैंदर, सीईएस कॉलेज.
बॉडी बिल्डिंग इंटर कॉलेजिएट (५५ किलोपेक्षा जास्त) : प्रथम- मार्क डायस, नॅशनल अकादमी, मडगाव, द्वितीय- तेजस नाईक, खांडोळा कॉलेज मार्शेल. (६० किलोपेक्षा कमी) : पहिला- रिदम सबनीस- जीव्हीएमएस कॉलेज. दुसरा- संगप्पा गौंदर, सीईएस कॉलेज, तिसरा- साईप्रीत नाईक, जीपीपी कॉलेज. (६० किला ते ७० किलो श्रेणी) : पहिला- प्रज्वल साळगावकर, आयटीआय बोर्ड. (७० किलोपेक्षा जास्त) : पहिला- प्रतीक गावस, डॉन बॉस्को कॉलेज, द्वितीय- कुंदन बखले, कारे कॉलेज,‍ तिसरा- जॉन पो, साळगावकर कॉलेज.
मेन्स फिजिक चॅम्पियनशिप (१७० सेमीपर्यंत खुली श्रेणी) : पहिला- अभिजित नाईक, एलिट फिटनेस, दुसरा- सोहेल मांद्रेकर, इन्फिनिटी जिम मडगाव, तिसरा-सोहेल चोपडेकर, फिटनेस हाऊस, रायबंदर. (१७० सेमीपेक्षा जास्त) : पहिला- अजय देसाई, हायड्रा फिटनेस, कुडतरी, दुसरा- शुभम कोठंबीकर, इन्फिनिटी जिम मडगाव, तिसरा- सोहेल चोपडेकर, फिटनेस हाऊस, रायबंदर.
बॉडी बिल्डिंग (५५ किलो श्रेणी ) : पहिला- अमित नांबियार, महाकाल फिटनेस, फोंडा, दुसरा- प्रथमेश नाईक, गॉडस्पीड जिम फोंडा, तिसरा- सागर रॉय, फट्टो फिट, बाणावली. (६० किलो श्रेणी) पहिला- नितीन मुरगावकर, पिटबुल जिम, दुसरा- धीरज कुंक्कळकर, फिटनेस हाऊस, रायबंदर, तिसरा- डेव्ह लोपेस, अनुप आणि शेरल फिटनेस. (६५ किलो श्रेणी) : प‌हिला- संतोष जामुनी, इन्फिनिटी जिम मडगाव, दुसरा- लालजीत चौधरी, किंग्ज जिम मडगाव, ‍तिसरा- प्रतीक गवस, जिम मडगाव. (७० किलो श्रेणी) : पहिला- अकबर नलबन, इन्फिनिटी जिम मडगाव. दुसरा- अभिजित नाईक, एलिट फिटनेस, तिसरा- अनिल कट्टीमणी, किंग्ज जिम मडगाव. (७५ किलो श्रेणी) : पहिला- रिस्टन रायकर, इन्फिनिटी जिम मडगाव, दुसरा- दुर्गेश पावसकर, सुपर युनिव्हर्सल, नावेली, तिसरा- महालिंग जोगळेकर, किंग्ज जिम मडगाव. (७५+किलो श्रेणी) : पहिला- रजत मयेकर, इन्फिनिटी जिम मडगाव, दुसरा- अजय देसाई, हायड्रा फिटनेस कुडचडे, तिसरा- रोहन गोवेकर, नॉर्बर्ट्स.
......
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक
सर्वोत्कृष्ट पोझर विजेता : नवीन नाईक, थोर फिटनेस, वास्को,
टीम चॅम्पियनशिप इंटर कॉलेजिएट : डॉन बॉस्को कॉलेज पणजी
टीम चॅम्पियनशिप खुली श्रेणी : इन्फिनिटी जिम मडगाव
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स : रजत मयेकर, इन्फिनिटी जिम मडगाव.
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स इंटर कॉलेजिएट : प्रतीक गावस, डॉन बॉस्को