वेरेच्या दयानंद बांदोडकर हायस्कूलला खो खोचे जेतेपद

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
27th February, 12:24 am
वेरेच्या दयानंद बांदोडकर हायस्कूलला खो खोचे जेतेपद

वेरे-रेईशमागुश दयानंद बांदोडकर मेमोरियल हायस्कूलच्या विजयी संघासोबत मुख्याध्यापक दीपक नाईक, क्रीडा प्रशिक्षक सतीश नाईक व इतर.      

हरमल : गोवा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आयोजित अंडर १४ बार्देश तालुका व उत्तर गोवा जिल्हा अजिंक्यपदासाठीच्या खो खो स्पर्धेत वेरेच्या दयानंद बांदोडकर मेमोरियल हायस्कूल संघाने जेतेपद पटकावले. सदर स्पर्धा किटला मैदानावर खेळविण्यात आली होती.

या स्पर्धेत उत्तर गोवा गटात, अंतिम सामन्यात खोलपे साळच्या शिवाजीराजे हायस्कूल संघाचा पराभव केला. तर अंतिम सामन्यात पेडणे हणखणे सरकारी हायस्कूल संघाचा पराभव करून जेतेपद पटकावले. विजयी संघास हायस्कूलचे क्रीडा प्रशिक्षक सतीश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. हायस्कूलच्या घवघवीत यशाबद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक नाईक व शिक्षक वर्गाने अभिनंदन केले आहे. विद्यालयाच्या या यशाबद्दल पालक वर्गात कौतुक होत आहे.