बंदुकीची गोळी लागल्याने एकजण जखमी

विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी संशयितावर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th February 2024, 04:51 pm
बंदुकीची गोळी लागल्याने एकजण जखमी

मडगाव : केपेतील नावारा बेनुर्डे येथील संशयित राजेंद्र मालू गावकर (४९) यांना बंदुकीतून सुटलेल्या गोळीने दुखापत झाली. जखमीवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. कुंकळ्ळी पोलिसांकडून याप्रकरणी विनापरवाना बंदुक बाळगून आपल्यासह इतरांच्या जीवाला धोका केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  कुंकळ्ळी पोलिसांकडून शस्त्र कायदा तसेच विनापरवाना बंदुक बाळगून बेजबाबदारपणे शस्त्र हाताळून आपणासह इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. संशयित राजेंद्र गावकर याने सक्षम प्राधिकाऱ्याकडून कोणताही वैध परवाना नसताना बेकायदेशीरपणे सिंगल बॅरल बंदुक बाळगल्याचे आढळून आले. तसेच बंदुक हाताळताना झालेल्य‍ा निष्काळजीपणामुळे स्वत:लाही गंभीर दुखापत करुन घेतली. संशयिताने बेकायदेशीररीत्या बंदुक बाळगत व हाताळत इतरांच्या जीवालाही धोका निर्माण केला. बंदुकीची गोळी लागल्याने जखमी राजेंद्र याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी पोलिस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करत आहेत.

विनापरवाना बंदूक सापडली असल्याने याचा वापर शिकारीसाठी केला जात होता, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे शिकारीसाठी गेल्यावर त्यांना गोळी लागली का, याचा तपास कुंकळ्ळी पोलीस करीत आहेत.