भावंडांतील भांडणे

Story: पालकत्व |
23rd February, 10:27 pm
भावंडांतील भांडणे

"आपल्या घरी नवीन छोटासा पाहुणा येणार आहे. तुला भाऊ हवा की बहीण?" "मला भाऊ किंवा बहिण कुणीही चालेल पण मी दादा असल्यामुळे माझं त्याला किंवा तिला ऐकावं लागेल मोठा खाऊ अगोदर मला मग राहिलेला त्या बाळाला" अशी आजी आणि नातवात चर्चा रंगली होती.

नातू बोलून तिथून निघून गेला. आजी आपल्याच जुन्या आठवणीत रमली. बाल संगोपनाशी निगडित असलेल्या एका कार्यक्रमात ती एके ठिकाणी बीजभाषणकर्ती म्हणून हजर होती. स्वतःच्याच भाषणातील मुद्दे तिला हळूहळू आठवू लागले.

आजी बीजभाषणात म्हणाली होती, "घरात दोन किंवा अधिक मुले असतील तर त्यांना एकटेपणा जाणवत नाही. एकत्र खेळणं आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं हा त्यांच्यातला महत्त्वाचा भाग असतो. काहीवेळा मुलांमध्ये एकमेकांसोबत मारामारीही होते. क्रीडा खेळांमध्ये मुले एकमेकांशी भांडू लागतात. मुलांमध्ये हे सामान्य आहे, परंतु जेव्हा मुले अनेकदा एकमेकांशी भांडू लागतात अशावेळी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. भावंडांमध्ये प्रेमसंबंध असणे सामान्य आहे. परंतु जेव्हा त्यांच्यातील भांडणे उपहासात्मक, अपमानास्पद, मत्सर आणि प्रतिस्पर्धी बनतात तेव्हा समजले पाहिजे की त्यांच्यात भावनिक जोडाचा अभाव आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या संगोपनाच्या वेळी पालकांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून मुलांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होऊन त्यांच्यातील भांडण गंभीर स्वरूप धारण करू नये." "घरी मुलं अनेकदा त्यांचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी एकमेकांशी भांडतात. मग त्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याचा योग्य मार्ग शिकवतात. त्यांना शिकवा की भांडणे किंवा ओरडणे त्यांना योग्य सिद्ध करणार नाही. भांडणामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे इतर मुलांशी नम्रपणे बोला आणि तुमचा दृष्टिकोन स्पष्ट करा.


जर तुमचे मूल इतर मुलाशी भांडण किंवा वादविवाद न करता त्याच्या समस्या सोडवत असेल तर त्याच्या सकारात्मकतेची प्रशंसा करा. मुलाच्या अशा वागण्याला प्रोत्साहन द्या जेणेकरून भविष्यात तो संघर्षाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारेल. जेव्हा दोन मुले भांडतात तेव्हा तुम्हाला त्यांच्यात समेट करण्याचा किंवा योग्य आणि चुकीचा फरक करण्याचा योग्य मार्ग माहीत असणे आवश्यक आहे. सर्व प्रथम भांडणाचे कारण काय आहे ते शोधा. दोघांचा दृष्टिकोन समजून मध्यस्थी करून प्रकरण मिटवा. दोघांनाही समान वागणूक द्या.""अनेकदा पालक मोठ्या मुलाला अधिक समजूतदार आणि लहान मुलाला भांडण न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे अनेक वेळा लहान मुलापेक्षा मोठ्या भावाशी किंवा बहिणीशी वाद घालण्यासाठी तो त्यालाच दोष देतो. दोघांनाही समान वागणूक द्या. जर मुले अनेकदा एखाद्या गोष्टीवरून एकमेकांशी भांडत असतील तर त्यांच्यातील भांडणाचा योग्य मुद्दा काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर घरात असे एखादे खेळणे किंवा वस्तू असेल ज्यामुळे मुले भांडत असतील तर ते खेळणे दोघांच्या आवाक्याबाहेर ठेवा. याशिवाय असे होऊ शकते की तुमच्या संगोपनाच्या वेळी तुम्ही अशा काही चुका करत असाल ज्यामुळे मुलांमधील भावनिक प्रेम संपत असेल. तो असा विचार करू लागला की पालक आपल्या भावावर किंवा बहिणीवर आपल्यापेक्षा जास्त प्रेम करतात हे त्यांच्यातील मत्सराचे कारण बनू शकते."

या भूतकाळात मारलेल्या फेरफटक्यातून परत येतानाच बाहेरून कसला तरी गोंगाट ऐकू आला. नातवाच्या वयाचाच शेजारील घरातील मुलगा आपल्या दादासोबत भांडत होता आणि बीजभाषणाची परिणामकारकता कशी आहे, आजही त्याची किती आवश्यकता आहे, याची जाणीव आजीला झाली आणि मनोमन हसू आले.


साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली गोवा.