व्ही फाॅर सांगे, शार्पशूटर बाॅईज आयोजित क्रिकेट स्पर्धा
नेत्रावळी पंचायत चषक २०२४ क्रिकेट स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण करताना राखी नाईक. साेबत इतर.
सांगे : व्ही फॉर सांगे आणि शार्पशूटर बॉईज आयोजित नेत्रावळी पंचायत चषक २०२४ क्रिकेट स्पर्धेत सीएससी बॉईज विचुंद्रे संघाने शानदार विजय पटकवला. अंतिम सामन्यात सीएससी बॉईज विचुंद्रेने जल्मी बॉईज नुने संघाचा पराभव केला.
अंतिम सामन्यातील विजेत्या सीएससी बॉईज विचुंद्रे संघाला गौरवशाली यशाबद्दल ट्रॉफी आणि रोख १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर जल्मी बॉईज नुने संघाने प्रशंसनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांना ६ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभाला नेत्रावळीच्या पंच सदस्य राखी नाईक उपस्थित होत्या. त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार शुभम नाईक (चोको) यांना देण्यात आला. तर विराज नागेकरच्या असामान्य फलंदाजी कौशल्यामुळे त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक देण्यात आले. हेमंत गावकरला सर्वोत्कृष्ट गोलंदाज पारितोषिकासाठी पात्र ठरविले.