अॅनिमलचा दबदबा : वर्ल्डवाइड ३५० कोटींचा टप्पा पार

रणबीरने शाहरुख खानच्या पठाणला टाकले मागे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th December 2023, 05:03 pm
अॅनिमलचा दबदबा : वर्ल्डवाइड ३५० कोटींचा टप्पा पार

मुंबई : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. या चित्रपटाने केवळ तीन दिवसातच जगभरात ३५० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त होती आणि वीकेंडही रेकॉर्डब्रेक होता. वर्ल्डवाइड कमाईमध्ये रणबीरने शाहरुख खानच्या पठाण, जवानला मागे टाकले आहे. चित्रपटाची खरी परीक्षा सोमवारी आहे पण आगाऊ बुकिंगचे अहवाल चांगले आहेत.
अॅनिमलने भारतात सुमारे २०२.५७ कोटी रुपये कमावले. त्याची जगभरातील कमाई ३५६ कोटींच्या पुढे गेली आहे. टी-सिरिजने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ३ दिवसांचा वर्ल्ड वाइड डेटा शेअर केला आहे. पठाणने ३ दिवसांत ३१३ कोटींची कमाई केली होती. 'जवान'चे ३ दिवसांचे जगभरात ३८४.६९ कोटी रुपये कमावले होते. अशा प्रकारे, अॅनिमल पठाणच्या पुढे आहे, मात्र कमाईमध्ये जवानचे रेकॉर्ड तोडू शकला नाही.
अॅनिमलची जगभरातील कमाई
शुक्रवार - ११६ कोटी
शनिवारी - १२० कोटी
रविवारी - १२० कोटी

'ए' प्रमाणपत्र मिळूनही​ बंपर कमाई
अॅनिमलला 'ए' प्रमाणपत्र मिळाले. कोणत्याही सणाच्या आसपास तो प्रदर्शित झाला नाही. विकी कौशलच्या सॅम बहादूर या चित्रपटाशीही टक्कर आहे. या दृष्टिकोनातूनही त्याची कमाई चांगली असल्याचे मानले जात आहे. चित्रपटातील काही बोल्ड सीन्स सेन्सॉर बोर्डाने एडिट करायला लावले आहेत. प्रेक्षकांना ते ओटीटीवर पाहायला मिळतील.

रणबीरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आेपनर
अॅनिमल रणबीर कपूरचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. या चित्रपटाने ६३.८० कोटींची ओपनिंग केली होती. ब्रह्मास्त्रची पहिल्या दिवसाची कमाई ३६.४२ कोटी रुपये होती. संजूने पहिल्या दिवशी ३४.७५ कोटींची कमाई केली होती.
वर्षातील दुसरा मोठा आेपनर
अॅनिमल हा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा आेपनर आहे. जवानची ओपनिंग ७५ कोटी रुपये होती. अॅनिमल ६३.८० कोटी. पठाण ५७ कोटी. टायगर ३ ची ओपनिंग ४४.५० कोटी आणि गदर २ ची ओपनिंग ४०.१० कोटी होती.