सिने वार्ता : 'सदाबहार' देव आनंद, त्यांचा काळा कोट आणि त्यांचे 'लार्जर देन लाईफ' व्यक्तिमत्व

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते 'ज्वेल थीफ' देव आनंद यांची आज १२वी पुण्यतिथी

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
03rd December 2023, 02:43 pm
सिने वार्ता : 'सदाबहार' देव आनंद, त्यांचा काळा कोट आणि त्यांचे 'लार्जर देन लाईफ' व्यक्तिमत्व

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते देव आनंद आज भलेही आपल्यात नसतील, पण चित्रपटांतील उत्कृष्ट अभिनयामुळे ते आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत. देव आनंदची शैली सर्वांपेक्षा वेगळी होती. आज 3 डिसेंबर, देव आनंद साहेबांची पुण्यतिथी. देव आनंद हे त्यांच्या काळातील फॅशन आयकॉन होते. त्यांची शैली त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली होती. त्या कळलात त्यांच्या लूकपासून ते हेअरस्टाईलपर्यंत सर्वच गोष्टी जबरदस्त होत्या. त्याची चालण्याची शैली आणि बोलण्याची लकब इतकी मोहक होती की प्रत्येकजण त्यांच्यासाठी वेडा झाला होता.


अभिनय आणि रोमँटिसिझमची जादू पसरवून जवळपास ६ दशके सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या देव आनंद साहेबांच्या अभिनयाचे आणि शैलीचे फक्त मुलीच नाही तर तरुण युवकही वेडे व्हायचे . त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर व्हायचे. हिंदी सिनेसृष्टीत अनेक स्टार्स आले आणि गेले, पण असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय सिनेमाचा इतिहास अपूर्ण वाटतो. या स्टार्सपैकी एक म्हणजे सदाबहार अभिनेता देव आनंद. १९४६  मध्ये 'हम एक हैं' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या देव आनंद यांनी एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होत.  'काला पानी' या सुपरहिट चित्रपटापासून त्यांच्या ब्लॅक कोटची मोहिनी सुरू झाली. या चित्रपटात त्यांनी पांढरा शर्ट आणि काळा कोट परिधान केला होता. तेव्हापासून त्याचा हा लूक लोकप्रिय झाला होता.

चित्रपटसृष्टीच्या इतिहासात देव आनंदला जेवढे प्रेम मिळाले तेवढे क्वचितच कोणत्याही अभिनेत्याच्या लूकला मिळाले असेल. त्याच्या लूकची मुलींमध्ये असलेली क्रेझ पाहून कोर्टाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. यानंतर संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत न्यायालयाने देव आनंद साहेबांना काळा कोट घालण्यास बंदी घातली होती.

देव आनंद जेव्हा काळा कोट घालायचे, तेव्हा ते कहरच करायचे. त्यांना बघूनच पांढऱ्या शर्टवर काळा कोट घालण्याची स्टाईल त्या काळात ट्रेंड बनली होती. पण अचानक असे काही घडले की देव आनंद यांना सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालण्यास बंदी घालण्यात आली. खरं तर देव आनंद जेव्हा कधी पांढर्‍या शर्टसोबत काळा कोट घालायचे तेव्हा मुली त्याला पाहून इतक्या वेड्या व्हायची की काहीही करायला तयार व्हायच्या. त्याला पाहण्यासाठी त्या छतावरून उडी मारायलाही तयार होत्या.

देव आनंद यांनी 'विद्या', 'जीत', 'शायर', 'अफसर', 'दो सितारे' आणि 'सनम'सह ११६ चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्याच्या निधनाच्या तीन महिने आधी प्रदर्शित झालेल्या 'चार्जशीट' या चित्रपटात देव आनंद शेवटचे दिसले होते.

अभिनेता होण्यापूर्वी देव आनंद कारकून म्हणून काम करायचे. या सदाबहार अभिनेत्याला पहिला पगार फक्त ८५ रुपये मिळाला होता. त्यांनी मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्येही काम केले आहे. या काळात त्यांना १६० रुपये पगार मिळाला.

देव आनंद यांना चित्रपट जगतात येण्याची प्रेरणा अशोक कुमार यांच्याकडून मिळाली. अशोक कुमार यांचे ते मोठे चाहते  होते. विशेष म्हणजे अशोक कुमारनेच त्यांना मोठा ब्रेक दिला होता. अशोक कुमारच्या 'जिद्दी' चित्रपटात देव आनंद दिसले होते.

देव आनंद यांना२००१  मध्ये भारत सरकारने पद्मभूषण आणि २००२ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते. ३  डिसेंबर २०११ ,रोजी  देव आनंद यांनी युनायटेड किंगडममध्ये हृदयविकाराच्या झटक्यामूळे त्यांचे निधन झाले.