घरीच बनवूया... बाहुल्या आणि खेळणी

Story: पुस्तकांच्या दुनियेत |
03rd December 2023, 03:28 am
घरीच बनवूया... बाहुल्या आणि खेळणी

काय मग मित्रांनो, बाहुल्या आणि खेळणी म्हटल्यावर डोळे चकाकले ना? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तर या बाहुल्यांचे, खेळण्यांचे आकर्षण असते. तुम्हा छोट्या मुलांना तर बाहुलीसोबत खेळताना वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. लहान मुली आपापल्या घरून बाहुल्या आणून त्यांना कपड्यांनी, दागिन्यांनी, फुलांनी सजवून भातुकलीचा खेळ खेळतात व बालपण रम्य करतात. मुलं सुद्धा त्यांच्यासोबत या खेळात रमतात. 

 पण या बाहुल्या, खेळणी जर विकत न आणता स्वतः च तयार करता आली तर? मग तुमच्यासाठी या आठवड्यात आणली आहे एक खास गम्मत. हे पुस्तक एक मजेशीर पुस्तक आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या बाहुल्या आणि खेळणी कशी तयार करायची याची माहिती व तंत्र दिलेले आहे. हे तंत्र अगदी सहज सोपे आहे. मुलांना याचा वापर करून नवनवीन खेळणी बनवता येतील. शिवाय याने पालकांचीही महागडी खेळणी घेण्यापासून सुटका होईल आणि नवनिर्मितीचा आनंद घेण्याबरोबरच मुलांची सर्जनशीलता वाढीला लागेल. आपण स्वत: बनवलेल्या खेळण्यांनी नक्कीच तुम्ही आनंदाने खेळाल.  

  • पुस्तकाचे नाव : घरीच बनवूया... बाहुल्या आणि खेळणी 
  • लेखक : देविदास संपतराव इटोकर
  • प्रकाशक : साकेत प्रकाशन 
  • एकूण पृष्ठ : ८८ 
  • किंमत : १००/- रुपये