व्हॅक्स दी गोवा

Story: माझा गोवा |
03rd December 2023, 03:26 am
व्हॅक्स दी गोवा

व्हॅक्स दी गोवा किंवा व्हॅक्स वर्ल्ड संग्रहालय हा ओल्ड गोवा येथे स्थित मेणाचे संग्रहालय आहे. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. प्रत्येक पुतळा पॅराफिन मेणाने काळजीपूर्वक कोरलेला आहे, तर त्यात वापरलेले केस नैसर्गिक आहेत, डोळे आणि दात कृत्रिम आहेत. महात्मा गांधी, मदर तेरेसा, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, आल्बर्ट आइस्टाइन, वास्को द गामा, लुईस पाश्चर, एडम-ईव्ह, अण्णा हजारे, अमिताभ बच्चन, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महेंद्र सिंह धोनी, शाहरुख खान, लता मंगेशकर, रजनीकांत, अमीर खान, सलमान खान, करीना कपूर इत्यादी प्रमुख व्यक्तींचे पुतळे. तसेच ड्रग्स विरोधात जागरुकता करण्यासाठी, भ्रष्टाचार विरोधी संदेश देणारे विशेष पुतळे पण आहेत. तर मुलांनो नक्कीच हे संग्रहालय बघायला जा, तुम्हाला नक्कीच आवडेल.


  • आदित्य सिनाय भांगी
  • साहाय्यक प्राध्यापक, 
  • हिंदी विभाग, गोवा विद्यापीठ