आयआरबीच्या दोन उपनिरीक्षकांना निरीक्षकपदी बढती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 11:42 pm
आयआरबीच्या दोन उपनिरीक्षकांना निरीक्षकपदी बढती

पणजी : भारतीय राखीव दलाचे (आयआरबी) पोलीस उपनिरीक्षक एल्वीस बार्बोझा आणि अपर्णा चोपडेकर या दोघांना निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार, याबाबतचा आदेश उपमहानिरीक्षक अस्लम खान यांनी जारी केला आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, एल्वीस बार्बोझा किनारी पोलीस विभागात तर अपर्णा चोपडेकर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागात (सीबीआय) प्रतिनियुक्तीवर सेवा बजावत आहेत. या अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी असणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.

गोवा पोलीस खात्यात कार्यवाहक (ऑफिशिएटिंग) उपअधीक्षकपदी असलेल्या २५ निरीक्षकांना नियमित उपअधीक्षक करण्यात आले आहे. तर अनुसूचित जमाती या राखीव गटात भारतीय राखीव दलाच्या (आयआरबी) दोन पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली होती. त्यामुळे आयआरबीची दोन निरीक्षक पदे खाली झाल्यामुळे वरील अधिकाऱ्यांचा बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बार्बोझा २००६ मध्ये तर अपर्णा २०१० मध्ये आयआरबीत रुजू झाले होते. 

हेही वाचा