विजय मर्चंट ट्रॉफीचे समर्थ राणेकडे नेतृत्व

गोव्याच्या १८ सदस्यीय संघाची निवड : उपकर्णधारपदी आराध्य गोयल

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th November 2023, 11:14 pm
विजय मर्चंट ट्रॉफीचे समर्थ राणेकडे नेतृत्व

विजय मर्चंट चषकासाठी निवडलेला गोवा संघ.

पणजी : १ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान, सुरत येथे होणाऱ्या विजय मर्चंट चषक एलिट गट स्पर्धेच्या प्रथम तीन सामन्यांसाठी गोव्याच्या १८ सदस्यीय संघाची निवड नुकतीच करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गोवा संघाच्या कर्णधारपदी समर्थ राणे याची निवड करण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून आराध्या गोयलची नियुक्ती केली आहे.
निवड झालेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत. समर्थ राणे (कर्णधार), आराध्य गोयल (उपकर्णधार) स्वप्नेश नाईक, रेयान केरकर, प्रद्युमन अटपटकर, वेंकट चिगुरुपती, साई नाईक, द्विज पालयेकर, शमिक कामत, अथर्व देविदास, जय कांगुरी, संचित नाईक नितीन घाडी. तनिश तेंडुलकर, मनहित कांगुरी, सुदित गुरव, दक्ष पैंगीणकर, ओम खांडोळकर.
राखीव खेळाडू : गौरव नाईक, आशुतोष तेंबकर, राज बांदेकर, कुशल नाईक.