भजन करून परतताना काळाने गाठले

सावंतवाडीत झाडाखाली सापडून दोन तरुणांचा मृत्यू

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27th September, 08:00 am
भजन करून परतताना काळाने गाठले

सावंतवाडी : येथील राजवाडा परिसरात भले मोठे झाड कोसळून त्याखाली सापडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. दोघेही युवक आंजीवडे-माणगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे. ते भजनासाठी सावंतवाडीत आले होते. तेथून दुचाकीने परतत असताना ही घटना घडली.


झाड दुचाकीवर कोसळल्यानंतर या युवकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी सावंतवाडी पालिकेचा बंब दाखल झाला व त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दोघेही युवक आंजीवडे-माणगाव येथील असल्याची माहिती मिळाली. ते भजनासाठी सावंतवाडीत आले होते. भजन आटोपून दुचाकीवरून परतत असताना ही घटना घडली.


झाड हटविल्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या दुर्दैवी घटनेमुळे सावंतवाडीसह माणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा