नावेलीतील अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 04:34 pm
नावेलीतील अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू

मडगाव : नावेली परिसरात सोमवारी रात्री झालेल्य‍ा दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू झाला. दीप्तेश दळवी (रा. खारेबांध) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेली परिसरातील अंतर्गत रस्त्यावर सोमवारी रात्री दुचाकीचा अपघात घडला. खारेबांध (मडगाव) येथील रहिवासी दीप्तेश दळवी हा सुमारे ११ वाजता गाडीवरून जात असताना अपघात घडला. हा अपघात ‘हीट अँड रन’चा प्रकार नसून स्वयंअपघात असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासणी व इतर माहिती घेतली जात असल्याचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी सांगितले. दरम्यान, मडगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची नोंद केली आहे.