चिमुकल्यांसाठी ७ रोजी आयर्नकिड्सचे आयोजन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th September, 11:19 pm
चिमुकल्यांसाठी ७ रोजी आयर्नकिड्सचे आयोजन

पणजी : मुलांना आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आनंद घेता येईल, ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आगामी आयर्नकिड्स रनमध्ये भाग घेऊन हा अनुभव त्यांना घेता येणार, लहान वयातच स्पर्धात्मक रेसिंग आणि फिटनेसची जाणीव असलेली सहा ते सोळा वर्षे वयोगटातील मुले आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेऊन त्याचा उत्साह अनुभवू शकणार, ही शर्यत आयर्नमॅन ७०.३ इंडियाचा भाग आहे, जी ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात होणार आहे.

६ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी एक कीमी, ९ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी दोन किमी, तर १३ ते १६ वर्षांच्या मुलांसाठी तीन कीमी अशा तीन नियुक्त श्रेणी आहेत. सर्व सहभागींना आयर्नकिड्स गोवा चॅलेंजमध्ये भाग घेतल्याबद्दल पदके दिली जातील, ही भारतातील मुलांसाठी आतंरराष्ट्रीय ख्यातीची एकमेव स्पर्धा आहे.

ही स्पर्धा ७ ऑक्टोबर रोजी पणजी येथील मिरामारजवळ आयोजित केली जाईल. या स्पर्धेत शारदा मंदिर, द गेरा स्कुल आदींसह गोव्यातील आघाडीच्या शाळा सहभागी होणार आहेत. तसेच कॉर्पोरेट गट त्यांच्या कर्मचार्‍यांना लहान वयातच कुटुंबातील फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी त्यांच्या मुलांची नोंदणी करण्यासाठी आवाहन केले आहे.