आपण जे वाचतो त्याचा आपल्या मनावर प्रचंड परिणाम होत असतो. आपल्याला जशी उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस आहाराची आवश्यकता असते, त्याचबरोबर भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उत्तम संस्कारक्षम वाचन साहित्याची नितांत आवश्यकता असते. मग मुलांनो, तुमच्या वाचनाची आवड अजून सकस बनवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी या पुस्तकात भारतीय बारा भाषांतील अनुवादित श्रेष्ठ बालकथा आहेत. या वेगवेगळ्या भाषांतील अनुवादक जसे की आसामी: शंकर कऱ्हाडे, उर्दू: श्याम कुरळे, उडिया: सरिता वैद्य आणि बाबूराव शिंदे, कन्नड: राजाभाऊ मंगळवेढेकर आणि ध्वनिधूपों. वे. जोगी, गुजराथी: लीला शिंदे, मधुकर प्रधान आणि सुनीता प्रधान, तमिळ: दि. वि. जोशी, तेलुगु: कल्याण इनामदार, पंजाबी: शंकर सारडा, बंगाली: विलास गिते आणि धुण्डिराज कहाळेकर, मल्याळी: अरुण देशपांडे, हिंदी: सुरेश सावंत आणि दत्ता डांगे, मराठी: संपादन: बाबा भांड. हे आपल्या मराठीतले महत्त्वाच्या अनुवादकांनी केलेले अनुवाद असल्याने वेगवेगळ्या भाषांमधील या कथा वाचायला तुम्हाला त्रास होणार नाही त्यामुळे या भारतीय १२ भाषांतील १३० श्रेष्ठ भारतीय बालकथांचा अनुवाद म्हणजे बालसाहित्य वाचकांसाठी उत्कृष्ट मेजवानीच आहे.
पुस्तकाचे नाव : श्रेष्ठ भारतीय बालकथा
संपादक : बाबा भांड
प्रकाशन : साकेत प्रकाशन
पाने : ६०६
किंमत : ७६० /-रुपये