सर्वणमध्ये हौसे पुजले जातात चतुर्थीच्या आदल्या दिवशी

पारंपरिक संस्कृतीचे महिलांकडून जतन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
18th September, 07:56 pm
सर्वणमध्ये हौसे पुजले जातात चतुर्थीच्या आदल्या दिवशी

सर्वण येथील डॉ. प्रवीण सावंत यांच्या निवासस्थानी पारंपरिक हौसे व गौरीपूजन केल्यानंतर महिला.

डिचोली : सर्वण येथील महिलांनी पारंपरिक हौसे पूजन उत्सव कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा केला.
सर्वण गावच्या परंपरेनुसार गौरीपूजन केले जाते व हौसे देवाला अर्पण करुन नंतर घरातल्या व शेजारील ज्येष्ठ तसेच बालगोपाळांना वाटण्यात येतात. ज्येष्ठांकडून आशीर्वाद घेतले जातात. परंपरेनुसार हौसे काही गावात नागपंचमीला पुजले जातात, तर काही ठिकाणी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच हरतालिका पूजनाच्या दिवशी पुजले जातात.
डॉ. प्रवीण सावंत यांच्या घरी महिलांनी एकत्र येऊन व मोठ्या उत्साहात घरातील चौकात हौसे पूजन केले. यावेळी घरातली ज्येष्ठ महिला सुंदरी सावंत यानी सगळ्या महिलांना एकत्र करून हौसे पूजनाचे महत्त्व विषद केले. त्यानंतर पूजन, आरती व गाऱ्हाणे घालून सांगता करण्यात आली.