भा.रा. भागवतांचा बन्या तुम्हाला आवडू लागलाय ना? कुणालाही आवडण्यासारखाच आहे बनेश फेणे. फास्टर फेणे मालिकेतील आठव्या पुस्तकात आपल्याला बन्याच्या पाच साहसकथा वाचता येतील. बन्या टोला हाणतो म्हणजे नेमकं काय करतो? हे जाणून घ्यायचंय तर आठवा भाग वाचलाच पाहिजे. ह्या पुस्तकात तस्करीची कुस्कारीकुस्कारी होते म्हणजे काय होतं? कोणत्या दानवाचं मानवात परिवर्तन होतं? हरिश्चंद्र गडावर बन्या कोणतं धाडस करतो? मुंबईच्या बंदरात बन्या कोणता मोठ्ठा मासा पकडतो? ते साहस केल्यानंतर त्याला कोणतं बक्षीस मिळतं? दागिन्यांचं बेट हा काय प्रकार आहे? बन्या तिथे कसा पोचतो? तिथे कोणती करामत करतो? या प्रश्नांची खुमासदार उत्तरं तुम्हाला 'फास्टर फेणे टोला हाणतो' या पुस्तकात सापडतील.