टीएमसी खासदार, अभिनेत्री नुसरत जहाँची ईडीकडून चौकशी

फ्लॅट विक्रीत ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12th September, 06:31 pm
टीएमसी खासदार, अभिनेत्री नुसरत जहाँची ईडीकडून चौकशी

कोलकाता : फ्लॅट विक्रीत ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टीएमसी खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या.

रिअल इस्टेट कंपनी ७ सेन्सेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली ४०० लोकांकडून प्रत्येकी ५.५ लाख रुपये घेतले होते. मात्र, लोकांना त्यांचे फ्लॅट किंवा पैसेही परत मिळाले नाहीत.

याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. २०१७ मध्ये नुसरत या कंपनीच्या संचालक होत्या. ईडी टीएमसी खासदारांच्या कंपनीतील भूमिकेबाबत चौकशी करणार आहे. चौकशीच्या संपूर्ण प्रक्रियेची नोंद केली जाईल. नुसरत जहाँ यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे.

नुसरत यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. नुसरत यांचा दावा आहे की, त्यांनी मे २०१७ मध्ये एका रिअल इस्टेट कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्यांनी व्याजासह कर्जाची परतफेड केली होती. तेव्हापासून त्यांचा कंपनीशी संपर्क नसल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा