ऑफिस स्पेससाठी साराने मोजले ९ कोटी!

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th July, 08:27 pm
ऑफिस स्पेससाठी साराने मोजले ९ कोटी!

केदारनाथ या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सारा रोहित शेट्टीच्या सिम्बा या चित्रपटात दिसली होती. या ५ वर्षात तिने तिच्या करिअरमध्ये खूप काही मिळवले आहे. आता अशा बातम्या येत आहेत की साराने मुंबईत नवीन ऑफिस विकत घेतले आहे आणि त्यावर मोठी रक्कम खर्च केली आहे.


सारा अली खान नुकतीच मुंबईत ऑफिसची जागा शोधताना दिसली. आता तिला हवी असलेली जागा मिळाली आहे. निर्माता आणि रिअल इस्टेट टायकून आनंद पंडित यांच्या लोटस डेव्हलपर्समध्ये तिने ही जागा घेतली असल्याचे बोलले जाते. साराचे ऑफिस मीडिया आणि प्रॉडक्शन हाऊससाठी सहज उपलब्ध आहे.
एवढी रक्कम साराने माेजली
या प्रीमियम ऑफिस स्पेससाठी साराने ९ कोटी रुपये खर्च केले आहेत. कार्यालये सध्या बांधकामाधीन आहेत आणि सप्टेंबर २०२३ पर्यंत तयार होतील. साराच्या वर्क फ्रंटकडे पाहिले तर ती शेवटची जरा हटके जरा बचके या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अभिनेता विकी कौशलसोबत होती. या चित्रपटातील तिची विकी कौशलसोबतची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.