'प्रोजेक्ट के'च्या पोस्टरची ‘आयर्न मॅन’शी तुलना

सोशल मीडियावर उठल्या चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20th July 2023, 06:49 pm
'प्रोजेक्ट के'च्या पोस्टरची ‘आयर्न मॅन’शी तुलना

'प्रोजेक्ट के'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता प्रभासचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आणि सोशल मीडियावर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही चाहत्यांना चित्रपटातील प्रभासचा नवीन सुपरहिरो लूक आवडला, तर काहींनी पोस्टरची खिल्ली उडवली आणि त्याच्या पात्राला 'स्वस्तातला आयर्न मॅन' म्हटले.
ट्विटरवरील लोकांनी प्रभासचे पोस्टर आणि रॉबर्ट डाउनी जूनियरच्या ‘आयर्न मॅन ३’ पोस्टरमध्ये तुलना करण्यास सुरुवात केली, कारण दोन्ही अभिनेते समान पोझमध्ये दाखवले आहेत. प्रभासचे डाय-हार्ड चाहते सुपरस्टारला 'भारतीय चित्रपटसृष्टीतील आयर्न मॅन' म्हणू लागले.
'प्रोजेक्ट के' रिलीज डेट
नाग अश्विन दिग्दर्शित ‘के’ या साय-फाय प्रोजेक्टमध्ये दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसने फर्स्ट लूक पोस्टरला 'हीरो उठता है' असे कॅप्शन दिले आहे. प्रभास आणि दीपिका सॅन डिएगो कॉमिक-कॉन (एसडीसीसी) च्या पहिल्या दिवशी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक, ट्रेलर आणि रिलीजची तारीख जाहीर करतील.