आयसीबी संघ डिचोली खासदार चषकाचा मानकरी

बिचोलिम फ्रेंड्स सर्कल संघावर आठ गड्यांनी विजय


25th May 2023, 12:33 am
आयसीबी संघ डिचोली खासदार चषकाचा मानकरी

डिचोली  मतदारसंघ खासदार चषक स्पर्धेत विजेत्या आयसीबी  संघाला  विजेतेपदाचा  चषक प्रदान करताना  संजय शेट्ये, कौस्तुभ पाटणेकर, अनिकेत चणेकर, विश्वास  गावस व इतर.        

 प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली : डिचोली  मतदारसंघ मर्यादित खासदार चषक क्रिकेट  स्पर्धेत  अंतिम सामन्यात आयसीबी  संघाने  बिचोलिम  फ्रेंड्स  सर्कल संघावर आठ गड्यांनी विजय मिळवत खासदार चषक स्पर्धेचे विजेतेपद  प्राप्त केले.       

छत्रपती  शिवाजी महाराज मैदानावर आयोजित या स्पर्धेत  एकूण १६  संघांनी  भाग घेतला होता. बक्षीस वितरण सोहळ्याला माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, कौस्तुभ पाटणेकर, महेश गावस, अनिकेत  चणेकर, विश्वास गावकर, निसार शेख, विश्वास गावस आदी उपस्थित होते.