डिचोलीतील राज्य बुद्धिबळ स्पर्धेत नीरज सारीपल्ली चॅम्पियन

विजेत्यांना चषक, रोख बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण


25th May 2023, 12:27 am
डिचोलीतील राज्य बुद्धिबळ  स्पर्धेत नीरज सारीपल्ली चॅम्पियन

बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसोबत प्रमुख पाहुणे सचिन आरोलकर, दुर्गेश कारापूरकर, दामोदर प्रभू, विराज शिरोडकर, नरहरी सावंत, सत्यवान हरमलकर व इतर.

प्रतिनिधी । गोवन वार्ता

डिचोली : डिचोलीत आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नीरज सारीपल्ली चॅपियन ठरला.  मंदार लाड  व  आर्यन  रायकर उपविजेते ठरले. येथील झांट्ये  जिमखाना  क्रीडा संकुलात आयोजित स्पर्धेला  मोठा प्रतिसाद लाभला. गटवार निकाल पुढीलप्रमाणे.

मुख्य  गटातील  इतर विजेते : कुलासो  रेव्ह बेन, पार्थ  साळवी, अनिश  नाईक, बेंझटर्कोव्ह डिमिट्री,  सचिन  गावडे, आयुष पेडणेकर, अथर्व सावळ, ईशान पागी, रचल  परेरा, जॉय  काकोडकर, लव्ह  काकोडकर, आयुष  नाईक.       

७ वर्षाखालील गट : सार्थक  नाईक, प्रभू देसाई नारायण.       

९ वर्षाखालील  गट : जोशुआ  टेलिस,  शरयू  ग्रासन.        

११ वर्षाखालील  गट : सारस  पवार, अथर्व बोरकर       

१३ वर्षाखालील गट : हृदय  मोरजकर, एडिन  ग्रोव्ह.       

१५ वर्षाखालील गट : नवल  सावंत  यांनी विजेतेपद  प्राप्त केले.      

 विजेत्यांना चषक, रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला गोवा बुद्धिबळ  संघटनेचे सचिव सचिन आरोलकर, दुर्गेश कारापूरकर, उमेश प्रभू, सरगम फळारी आदी उपस्थित होते.