मोर्ले-कॉलनी सत्तरीतील कराटेपटूंची उत्कृष्ट कामगिरी

कराटेपटूंना मुख्य प्रशिक्षक विष्णू नाईक यांचे मार्गदर्शन


25th May 2023, 12:24 am
मोर्ले-कॉलनी सत्तरीतील  कराटेपटूंची उत्कृष्ट कामगिरी

मोर्ले कॉलनी येथील विजेत्या कराटेपटूंसोबत मुख्य प्रशिक्षक विष्णू नाईक.      

वार्ताहर । गोवन वार्ता

केरी-सत्तरी  : गोवा स्कूल ऑफ फुल कॉन्टॅक्ट बिनो-रिव कराटे संस्थेतर्फे वाळपई येथील गोविंद इंदिरा सभागृहात नुकत्याच घेतलेल्या आंतरदोजो कराटे स्पर्धेत मोर्ले कॉलनी सत्तरीतील कराटेपटूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांनी १५ पदके प्राप्त केली. या कराटेपटूंना मुख्य प्रशिक्षक विष्णू नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.      

या स्पर्धेत कुमिते प्रकारात सारा कृ. गावस, अनुष्का गावस व आर्या पार्सेकर यांनी सुवर्णपदके प्राप्त केली. शायना गावस व रिद्धी राऊत यांनी रौप्य पदके, कवीश गावस, यश राणे, दुर्वाई गावस, आस्था गावस, अवनिश गावस, भावेश गावस व सारांश गावस यांना कांस्य पदके प्राप्त झाली. काता प्रकारात सारा गावस हिने रौप्य पदक पटकावले, तर शायना गावस व अवनिश गावस यांनी कांस्य पदके पटकावली. विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.