बस्तोडा फुटबॉल स्पर्धेत बोआविस्ता (ब) जेता

पंचायतीतर्फे आयोजन : १५ वर्षांखालील गटात एफसी गोवा अव्वल


25th May 2023, 12:23 am
बस्तोडा फुटबॉल स्पर्धेत बोआविस्ता (ब) जेता

बस्तोडा पंचायत आयोजित ‘८ ए साईड’ आंतरप्रभाग फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला चषक प्रदान करताना फ्रॅन्की कार्व्हालो. सोबत प्रकाश भिवशेट, प्रथमेश शंकरदास व इतर. (उमेश झर्मेकर)


प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा : बस्तोडा पंचायत आयोजित ८ ए साईड आंतरप्रभाग फुटबॉल स्पर्धेतील सर्वसाधारण बोआविस्ता (ब) संघाने, तर १५ वर्षांखालील प्रदर्शनीय गटात एफसी गोवाने विजेतेपद पटकावले. सर्वसाधारण गटातील उपविजेतेपद मेन्झी बॉईज मिनेझिस वॉर्डला मिळाले. प्रदर्शनीय गटात जीएफडीसी बस्तोडा संघाला उपविजेतेपद मिळाले. 

या स्पर्धेचे उद्घाटन हळदोणाचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण भाजपचे उत्तर गोवा उपाध्यक्ष फ्रॅन्की कार्व्हालो व म्हापशाचे नगरसेवक प्रकाश भिवशेट यांच्या हस्ते झाले. विशेष आमंत्रित म्हणून गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास, जिल्हा पंचायत सदस्य मनीषा नाईक, मुख्याध्यापक दत्तप्रसाद पाळणी, माजी सरपंच रणजीत उसगावकर, शंकर गाड, उपसरपंच सुनीता लोटलीकर, पंच सुभाष मोरजकर, राखी नारोजी, रितेश बेळगावकर, राजेश पिरणकर व सनीला साळगावकर उपस्थित होत्या. या प्रसंगी बस्तोड्यातील ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा गौरव करण्यात आला.