ओटीटीवर मे महिन्यात मनोरंजनाचा सुकाळ


05th May 2023, 12:10 am

‘किसी का भाई, किसी की जान’पासून ते पोनीयिन सेल्वन-२ पर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार स्पर्धा सुरू आहे आणि सुरू होणार आहे. परंतु यादरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मनेही आपली पकड मजबूत केली आहे.

तू झुठी, मैं मक्कार (नेटफ्लिक्स)

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या रोम-कॉमने थिएटरमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली. पठाणनंतर 'तू झुठी, मैं मक्कार'ने ४७ दिवस थिएटर्सवर वर्चस्व गाजवले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात एकूण १४६ कोटी आणि जगभरात २२५ कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट ओटीटीवर येण्याची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत निर्मात्यांनी 'तू झुठी, मैं मक्कर' नेटफ्लिक्सवर रिलीज केला आहे.

सास, बहू और फ्लेमिंगो (डिस्ने प्लस हॉटस्टार)

डिंपल कपाडिया पठाणनंतर ‘तू झुठी, मैं मक्कार’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये ती पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसली. आता तिचा सास बहू और फ्लेमिंगो हा चित्रपट लवकरच दार ठोठावण्याच्या तयारीत आहे. राधिका मदन, अंगिरा धर, ईशा तलवार, नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या या मालिकेत डिंपल कपाडिया राणी बा या दमदार व्यक्तिरेखेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे.

विक्रम वेधा (जिओ सिनेमा)

हृतिक रोशन-सैफ अली खान स्टारर विक्रम वेधा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात अपयशी ठरला. हा तमिळ चित्रपट हिंदीत त्याच शीर्षकाने प्रदर्शित झाला. पुष्कर-गायत्री दिग्दर्शित हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ८ मार्चला जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सैफ-हृतिकशिवाय राधिका आपटेचीही महत्त्वाची भूमिका होती.

क्वीन शार्लोट : द ब्रिजरटन स्टोरी (नेटफ्लिक्स)

क्वीन शार्लोट : द ब्रिजरटन स्टोरी हा नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो ब्रिजरटनचा प्रीक्वल आहे. यामध्ये राणीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ही मालिका ४ मे रोजी प्रदर्शित झाली आहे.

दहाड (अमेझॉन प्राईम)

सोनाक्षी सिन्हा आता 'डबल एक्सएल' नंतर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. अमेझॉन प्राइमवर रिलीज होणाऱ्या 'दहाड' या वेब सीरिजमधून ती पदार्पण करत आहे. ही एक क्राइम थ्रिलर मालिका आहे, ज्यामध्ये सोनाक्षी इन्स्पेक्टर अंजली भाटीची भूमिका साकारत आहे. ही मालिका १२ मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

ताज-२ (झी-५)

नसीरुद्दीन शाह आणि अदिती राव हैदरी यांच्या ताज-१ ला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता निर्माते त्याचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. या पीरियड ड्रामा मालिकेची घोषणा गेल्या महिन्यातच झाली होती. या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये १५ वर्षांनंतरची कथा दाखवण्यात येणार आहे. ही मालिका १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

अँट-मॅन अँड द वास्प क्वांटुमेनिया (डिस्ने प्लस हॉटस्टार)

'अँट-मॅन अँड द वास्प क्वांटोमेनिया' या हॉलिवूड चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात पॉल रुड, इव्हॅन्जेलिन लिली, मायकेल डग्लस, कॅथरीन न्यूटन आदी कलाकार होते. आता हा चित्रपट १७ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर दाखल होणार आहे.

जॅकफ्रूट (नेटफ्लिक्स)

‘जॅकफ्रूट’ हा यशोवर्धन मिश्रा दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. मोबा या काल्पनिक शहरामध्ये बेपत्ता झालेल्या एका फणसाभोवती फिरणारी ही कथा आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १९ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

फुबर (नेटफ्लिक्स)

अर्नोल्ड श्वार्झनेगर 'फुबर' च्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ही मालिका एका सीआयए एजंटची कथा आहे, ज्याला त्याच्या निवृत्तीच्या काही दिवस आधी त्याच्या कुटुंबाचे एक मोठे रहस्य कळते. ही अॅक्शन कॉमेडी ड्रामा जॉर्नरची मालिका आहे, जी २५ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ऑपरेशन फॉर्च्यून (चित्रपट)

ऑपरेशन फॉर्च्यून : रुज दं गिरे लायन्सगेट प्लेवर रिलीज होत आहे. हा एक स्पाय अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे ज्यात जेसन स्टॅथम, ऑब्रे प्लाझा, जोश हार्नेट, कॅरी एल्वेस आणि ह्यू ग्रँट हे कलाकार आहेत. हा चित्रपट यूएस आणि यूकेमध्ये रिलीज झाला आहे.

फायरफ्लाइज (मालिका)

फायरफ्लाइज हा पार्थ आणि जुगनू ही कल्पनारम्य मालिका झॅ-५ वर प्रवाहित होईल. या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत गाबा यांनी केले आहे. मीत मुखे, झोया अफरोज, प्रियांशू चॅटर्जी आणि ल्यूक केनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.