नितीश राणा केकेआरचा कर्णधार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th March 2023, 12:40 am
नितीश राणा केकेआरचा कर्णधार

नितीश राणा

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १६ वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या हंगामात स्टार खेळाडूंच्या दुखापतींशी झुंज देत आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या मोसमात खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी नितीश राणाची कर्णधारपदी निवड केली आहे.
केकेआरने आपल्या निवेदनात म्हटले की, श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणा कर्णधार असेल. आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये श्रेयस आमच्यासाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षाही केकेआरने केली आहे.
केकेआरचे संभाव्य खेळाडू :
एन जगदीसन (यष्टिरक्षक), रहमानउल्ला गुरबाज, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, टिम साऊदी/लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
राणाची आयपीएल कारकीर्द
नितीश राणाने आयपीएलच्या ९१ सामन्यांत २१८१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३४ आणि सरासरी २८ आहे. त्याने १५ अर्धशतकेही झळकावली आहेत. नितीश राणाने २०२२ हंगामात ३६१ धावा, २०२१ हंगामात ३८३ धावा, २०२० हंगामात ३५२ धावा आणि २०१९ हंगामात ३४४ धावा केल्या आहेत.

आयपीएल २०२३ मधील १० कर्णधार
चेन्नई सुपर किंग्ज : एमएस धोनी
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : फाफ डु प्लेसिस
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन
पंजाब किंग्स : शिखर धवन
कोलकाता नाईट रायडर्स : नितीश राणा
सनराइज हैदराबाद : एडन मार्कराम
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर