एल. डी. सामंत विद्यालयाला विजेतेपद

बार्देश तालुका आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March 2023, 12:37 am
एल. डी. सामंत विद्यालयाला विजेतेपद

पेडे-म्हापसा येथे आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील एल. डी. सामंत विद्यालयाचा विजेता संघ.

म्हापसा : पेडे-म्हापसा येथे आयोजित बार्देश तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत पर्वरीच्या एल. डी. सामंत विद्यालयाने श्रीराम विद्यामंदिरचा पराभव करून विजय प्राप्त केला. राज्य क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे १७ वर्षाखालील मुलांची बार्देश तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कोलवाळच्या श्रीराम विद्यामंदिर विद्यालयाच्या संघाने निर्धारित १८ षटकांत १०० धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना अष्टपटू मिहीर कुडाळकर याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर एल. डी. सामंत विद्यालयाच्या संघाने केवळ ९ षटकांत हा सामना ९ गडी राखून जिंकला व विजेतेपद पटकावले.