फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ संघ विजयी

सिद्धार्थ झर्मेकर ‘मालिकावीर’, तर अशोक गावडे ‘उत्कृष्ट गोलंदाज’

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March 2023, 12:36 am
फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ संघ विजयी

हेल्दी प्रीमियर लीग स्पर्धेचा आकर्षक चषक स्वीकारताना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ संघाचे खेळाडू.

फोंडा : फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ संघाने सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आयोजित केलेल्या हेल्दी प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्बन आरोग्य केंद्र पणजी, संघाचा पराभव केला. स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. उपजिल्हा इस्पितळाचे कर्णधार सिद्धार्थ झर्मेकर यांना मालिकावीर, तर अशोक गावडे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना अर्बन आरोग्य केंद्र पणजी संघाने निर्धारित ३ षटकांत एकूण २५ धावा केल्या. त्यानंतर फोंडा उपजिल्हा इस्पितळात संघाच्या खेळाडूंनी १.४ षटकात २७ धावा करून स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. विजेत्या संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेत चांगली कामगिरी करून विजेतेपद प्राप्त केल्यानंतर इस्पितळाचे अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. इस्पितळात सेवा बजावताना क्रीडा क्षेत्रात सुद्धा कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते, असे डॉ. मडकईकर यावेळी म्हणाल्या.