काही वाहतुकीतले संवाद

आपल्यापैकी खूप जणांनी वाहतूक नियम तोडले असतील व कधी ना कधी चलान भरावे लागले असेल. जेव्हा असे घडते तेव्हा खरे ऐकण्यासारखे असते ते म्हणजे तो ड्राईव्हर व ट्रॅफिक पोलीसामधील संवाद. त्यावर आधारित हा संवादात्मक लेख!

Story: आदित्यच्या चष्म्यातून | आदित्य सिनाय � |
25th March 2023, 11:46 pm
काही वाहतुकीतले संवाद

एका चेक नाक्यावर दोन ट्रॅफिक पोलीस थांबले होते. रात्रीची वेळ. दोघे एकमेकांना - काय रे, खूप वेळ झाला कुणीच ग्राहक नाही. कुणाला मारुया तालांव?

इतक्यात समोरून एक जुनी मारुती ८०० येताना दिसली. तिची एक हेडलाईट चालू होती.

पहिला ट्रॅफिक पोलीस दुसऱ्याला - थांबव हं त्याला! मिळाला एक ग्राहक! एकच डोळ्याचा येतोय बघ. थांबवूयाच त्याला.

पहिला पोलीस - काय रे, कुठे जातोस इतक्या रात्री? कुठून आला? एकच डोळा आहे मरे! Improper lighting, फाईन भरावी लागणार ८०० रुपये.

ड्राईव्हर - तिथे समोर गेलो होतो सर, आत्ता बंद पडलीय लाईट. उद्या दुरुस्त करतो सर. आता दुकान बंद झालंय.

पोलीस - लायसंस दाखव!

त्याने त्याच्या सोबत असलेल्याचे लायसंस दाखविले.

पोलीस - तुझे कुठे आहे?

ड्राईव्हर - मोबाईलवर आहे सर! चार्ज नाही सर!

पोलीस - आण मोबाईल इकडे, चार्ज करू!

ड्राईव्हर - सर, पूर्ण चार्ज करून मिळेल ना?

नंतर त्याने मोबाईल दिलाच नाही! 

पण म्हणाला - सर आहे लायसंस, दुसऱ्या फोनवरून घरी फोन करून फोटो पाठवायला लावतो मित्राच्या मोबाईलवर.

पाच मिनिटांनी - सर, घरचे फोनच घेत नाहीत. पण लायसंस आहे सर खरंच व लाईट पण आत्ता गेलीय सर.

पोलीस - बिल भरले नाही म्हणून गेलीय ती. आता फाईन भर ८०० रुपये आणि जा. उद्या येणार लाईट.

ड्राईव्हर - पैसे नाहीत सर खरेच! काही discount द्या की!

नंतर दहा मिनटे पाय पडण्याचा ड्रामा झाला व मग दोघे पोलीस एकमेकांना - १०२ लाऊया की १०५? कुठला तरी एक लाऊया. अडवलं आहे ना!

मग त्याने फाईन भरली व तो गेला. (किती भरली काय माहीत!)

नंतर दोघे पोलीस - चला जाऊ आता! किमान एक ग्राहक सापडला. घरी जाऊ!

दुसऱ्या रात्री ते त्या जागेवर लवकर आले कारण त्यांना कुणी सांगितले की लवकर आल्यास जास्त लोक भेटणार. 

दोघे एकमेकांना सांगू लागले - जास्त वेळ काढू नये आज. ४-५ जणांना पकडूया व जाऊया.

इतक्यात त्यांनी एका गाडीला अडवलं - काय रे कुठे जातो?

तो - पुढेच साहेब.

पोलीस - नाव बोल?

तो - सचिन.

पोलीस - काय तेंडुलकर आहेस? पूर्ण नाव बोल. काय दारू वगैरा प्यायलास?

तो - नाही हो सर, मी तर शाकाहारी आहे.

पोलीस - पकडले गेल्यावर चोर सुद्धा म्हणतो मी चोरी नाही केली म्हणून.

थोड्या वेळाने समोरून एक टँपो आला. पोलीसांनी त्याला अडवायला हात केला. तर ड्राईव्हर सुद्धा त्यांना हात वर करून Hi म्हणून आणि न थांबता निघून गेला.

थोड्या वेळाने पुढून एक स्प्लेंडर आली. तिची हेडलाईट मध्येच पेटत होती तर मध्येच बंद होत होती. 

पोलिसांनी त्याला अडवले- काय रे? लाईट नाही, तुला आणून कुणी ठोकणार. लाव बाजूला व खाली उतर. लाईसंस घेऊन ये.

तो म्हणाला - "बघा सर, अशी हाताने वायर धरून ठेवली तर पेटते."

पोलीस- "म्हणजे पूर्ण रस्त्यात तू काय असा डावा हात वायरला धरून चालवणार? असा?" (पोलिसांनी नक्कल पण करून दाखवली) आजूबाजूचे लोक हसू लागले. "उतर आणि ये लाईसंस घेऊन." त्याच्यापाशी लाईसंस नव्हते. तो शिव्या देऊ लागला. 

पोलीस - "काय रे कुणाला देतोस तू शिव्या? बघ स्वतःला आधी, लायकी काय आहे रे तुझी? माझ्या शिव्या ऐकणार? गप्प बस व ये इकडे." 

तो म्हणाला, "भाऊ येणार लाईसंस घेऊन." 

काही वेळाने भाऊ आला. बघतो तर त्याचा भाऊ व तो पोलीस एकमेकांना ओळखत होते. पोलिसांनी भावाशी कंप्लेन केली. 

भाऊ म्हणाला, "साहेब, मी सांगून थकलो त्याला. तुम्हीच बघा आता. या आधी गंभीर अपघात झालाय त्याचा. ते तिघेजण जात होते. त्यातला एकटा रस्त्यावर तत्काळ मरण पावला. याच्या पायाला लोखंडाची पट्टी घातलीय. पण तरी याची मस्ती उतरत नाही म्हणजे बघा." 

पोलीस म्हणाला - "याला आम्ही काहीच करू शकत नाही. देवच बघणार याला."

सिंघम फिल्मची स्थिती खरीच आहे. पोलीस खाते कधी कधी स्वतंत्र काम करायचा प्रयत्न करते पण वरचे मंत्री त्यांच्यावर दबाव आणतात. पण स्वतः उच्च अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव असतो ही पण सत्य स्थिती आहे.

आणखी एक इसमाला अडवले. "काय रे हॅल्मेट कुठे?" 

तो - "हॅल्मेट कशाला भाऊ? ते बघा समोर माझे घर आहे. मी रोज सकाळी याच वेळेवर मासळी आणायला जातो. तुम्ही आज पहिल्यांदाच इथे थांबलेयत. घर व मासळीवाली मध्ये फक्त २०० मीटरचा अंतर आहे. मग का ते हॅल्मेट?" 

पोलीस त्याला - "अरे पण या काळात तुला कुणी पाठीमागून धडक दिली तर? त्यापेक्षा तू चालत जा की!"

मग तो - "चालतानासुद्धा कुणी ठोकले तर?" 

पोलीस - "मग चालताना सुद्धा हॅल्मेटचा वापर करता जा की रे!"

आणखी एक मोठा अपघात झाला. त्यात तर एका दारुड्याने स्वतः येऊन गाडीवर ठोकली व स्वतःच मेला. पण मग काय? दरुड्याचा बाप मंत्र्याचा कार्यकर्ता निघाला. एका फोनवर दारुड्याला 'मोक्ष' मिळाला व विनाकारण केस चांगल्या ड्राईव्हरवर.

शेवटी हा भारत देश आहे. सिंघमचे डायलॉग म्हणायचे झाले तर या देशात राजकारणात सिस्टम नाही पण सिस्टममध्ये राजकारण खूप आहे.