मिक्स कोंब काढलेले सालाद, चार ते सहा जणांसाठी

Story: उदरभरण | चंदन च्यारी |
25th March 2023, 11:42 pm
मिक्स कोंब काढलेले सालाद, चार ते सहा जणांसाठी

साहित्य-  मूग कोंब काढलेले - १६० ग्रॅम,  पांढरे व हिरवे चणे  - १६० ग्रॅम,  पांढरे व हिरवे वाटाणे - १०० ग्रॅम,  शेंगदाणे - १०० ग्रॅम,  बटाटा उकडलेला - १ नग, गाजर उकडलेला - १ नग, लेट्यूस आइसबर्ग - १०० ग्रॅम, टोमॅटो - २ नग

सलाड ड्रेसिंग : सलाड (तेल) - ४ मोठे चमचे, काळी मिरीपूड - १ चिमूट, सिंथेटिक विनेगर/लिंबू रस - २ मोठे चमचे, मीठ - चवीनुसार, साखर  - अर्धा लहान चमचा

कृती : सगळी कडधान्ये धुऊन घेतल्यावर ती दीड मिनिटे मंद आचेवर शिजवा. त्यात मीठ टाका. उकळ आल्यावर त्यातले पाणी काढून घ्या व ते बाजूला थंड व्हायला ठेवा.

 उकडलेला बटाटा, गाजर, लेट्यूस व टोमॅटो क्यूबच्या आकाराने  चिरून घ्या.  मग सलाड ड्रेसिंगचे मिश्रण करून ते या सलाडवर टाका आणि ढवळून घ्या.

टीप : १. सर्व कडधान्य आपण अगोदर चांगली निवडून धुवून त्यांना कोंब काढून घ्या.

२. आपण सलाड ड्रेसिंग अगोदर तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

(लेखक आखाती देशांमध्ये सुमारे १७ वर्षे शेफ म्हणून नोकरी करून परतलेले गोव्यातील प्रसिद्ध पिझ्झा मेकर आहेत.)