नंदेश चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा ‘मिस्टर हायड्रा २०२३’ : अजय देसाई ‘फिजिक चॅम्पियन’


30th January 2023, 10:17 pm
नंदेश चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : प्रेरणा कला सांस्कृतिक मंडळाने हायड्रा फिटनेसच्या सहकार्याने राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा ‘मिस्टर हायड्रा २०२३’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स मिस्टर हायड्रा २०२३ नंदेश रायकरने पटकावले तर ‘फिजिक चॅम्पियनशीप’ प्रकारात अजय देसाई याने विजेतेपद पटकावले.

फिजिओ पार्टनर होप, हॉस्पिटॅलिटी पार्टनर नंदनवन रॉक व्हॅली आणि मीडिया पार्टनर प्रूडंट मीडिया यांच्या सहकार्याने कुडचडे न्यू म्युनिसिपालिटी बिल्डिंग येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व बॉडी बिल्डर्स असोसिएशन (जीबीबीए), भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन (आयबीबीएफ) च्या संलग्न युनिटने ही स्पर्धा आयोजित केली होती. बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप ६ वेगवेगळ्या प्रकारात पार पडली. गट ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो आणि ७५ किलोपेक्षा जास्त आणि पुरुष फिजिक चॅम्पियनशीप खुल्या गटात आयोजित करण्यात आली होती.

प्रेरणा कला सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या या भव्य व प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे साक्षीदार प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मीकांत कुंकळ्ळीकर, महेंद्र देसाई, विवेक फळदेसाई, वीरेश हरिमठ, विशांत गावडे, शुभम गावस, कायतान डायस आणि उमेश आमेरकर यांनी केले. या स्पर्धेत एकूण ८० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील गट आणि विजेते

पुरुष फिजिक गट

प्रथम पारितोषिक अजय देसाई (हायड्रा फिटनेस, कुडचडे), द्वितीय हमीद सय्यद (एलिट फिटनेस, मडगाव), तृतीय विजय सुतार (हायड्रा फिटनेस, कुडचडे), चौथे कृष्णानंद नाईक (चौगुले जिम, मडगाव), पाचवे सनी कुंकळ्ळीकर (फिटनेस हाऊस, रायबंदर)

५५ किलो वर्ग

पहिला : रिध्विक कुंबळी (पिट बुल जिम, सांताक्रूझ), दुसरा : प्रथमेश नाईक (नॉर्बर्ट फिटनेस, फोंडा), तिसरा : सुशांत पुजारी (रॉयल फिटनेस, कुडचडे), चौथा : उत्कर्ष देसाई (एसएजी कुडचडे), पाचवा अल्ताफ खान : (प्लस पॉइंट जिम, बाळ्ळी)

६० किलो वर्ग

पहिला : हमीद सय्यद (एलिट फिटनेस, मडगाव), दुसरा : नितीन मुरगावकर (पिटबुल, सांताक्रुझ), तिसरा : विनय पाटकर (इन्फिनिटी जिम मडगाव), चौथा : आकाश शिरोडकर (फिटनेस हाऊस, रायबंदर), पाचवा : रजत देसाई (प्लस पॉइंट जिम, बाळ्ळी)

६५ किलो वर्ग

पहिला : राजू तेली (सुपर युनिव्हर्सल नावेली), द्वितीय : आकाश मुळगावकर (बॉडी क्राफ्टर्स, थिवी), तिसरा : कृष्णानंद नाईक (चौघुले जिम, मडगाव), चौथा : सोनू कुमार (पिट बुल जिम, सांताक्रूझ), पाचवा : जोशुआ फर्नांडिस (पिट बुल, सांताक्रूझ)

७० किलो वर्ग

पहिला : नितीन रायकर (चिरंजीय जिम, फोंडा), दुसरे : विराज सांगोडकर (इम्पॅक्ट जिम, अंजुणा), तिसरे : विष्णू राऊत देसाई (हायड्रा फिटनेस, कुडचडे), चौथे : आशिष शिरोडकर (इन्फिनिटी जिम, मडगाव), पाचवा : सुमित संध (एके फिटनेस हब, वास्को)

७५ किलो वर्ग

पहिला : नंदेश रायकर (पर्रा फिटनेस क्लब, पर्रा), दुसरा : तेजस शेटगावकर (सिटी जिम, वास्को), तिसरा : अजय देसाई (हायड्रा फिटनेस, कुडचडे), चौथा : रोहित प्रभू (पॉवर जिम, केपे), पाचवा : चंद्र सिद्दी (फॅट २ फिट, बाणावली)

७५+ किलो वर्ग

पहिला : विनय शेट्टी (फॅट २ फिट जिम), दुसरा : अनुप वेर्णेकर (इनफिनिटी मडगाव), तिसरा : 

रोहित नाईक (सुपर युनिव्हर्सल जिम, नावेली), चौथा : सुजित फळदेसाई (प्लस पॉइंट जिम, बाळ्ळी), पाचवा : रेहान मलिक (पिट बुल जिम, सांताक्रूझ)