गोमंतकीय रंगभूमी

नाट्यकला आणि संस्कृती ही गोमंतकीय जीवनाची दोन सांस्कृतिक रूपे आहेत म्हणूनच गोमंतकीय रंगभूमीला एक दीर्घ परंपरा लाभलेली आहे. यात आलेले अनेक चढ उतार स्वीकारून गोमंतकीय रंगभूमीने आपले सातत्य अविभाज्यपणे सांभाळले आहे.

Story: गोमंतकीय रंगभूमी | श्रीधर कामत बांबोळ� |
28th January 2023, 11:08 pm
गोमंतकीय रंगभूमी

गाेमंतकीय रंगभूमीचे पुढे सविस्तर विवेचन करण्यापूर्वी संस्कृत रंगभूमीचे विवेचन करणे योग्य ठरेल. तसेच किमान लोकनाट्याचेही किंचित विवेचन करणे योग्य ठरेल. नाट्यशास्त्राची प्रस्थापना करणारी अभिजात रंगभूमी, भक्ती संप्रदायाच्या प्रभावाने नव्या वळणावर जाणारी रंगभूमी, काळ-प्रादेशिक परिस्थितीतून आलेले सामाजिक भान या सगळ्यांचा प्रभाव लोक रंगभूमीवर झाला. सूत्रधार, नटी, विदूषक अभिजात रंगभूमीवरून लोकनाट्यात आलेले आपण पाहतो. आजच्या नाटकांकडे तुलना करताना हे सगळे प्रकार सामान्य स्वरूपाचे दिसले तरी याच लोककला प्रकारांनी इथली रंगभूमी जिवंत ठेवली आहे.

खरे पण हे सृजनशील आणि सक्रिय रंगकर्मींसाठी  लोक आविष्काराचे महत्त्व फार महत्त्वाचे आहे आणि त्यातल्या संवेदनशील संपर्कातून आजच्या शहरी रंगभूमीची बहुतेक निष्प्राणता आणि यांत्रिक कथा सोडून त्यात कल्पनाशीलता आणि खोली (depth) आणण्याचे पुष्कळ उपाय सुचू शकतात. पारंपरिक रंगभूमीची उत्स्फूर्तता, चित्र-रंग रचना, तसेच दृश्य विधानातून बाह्य वास्तवतेपेक्षा दर्शकांच्या कल्पनाशक्तीवर जास्त भर असतो. अभिनेता आणि दर्शक वर्ग यांच्यात जास्त घनिष्ठ आणि सरळ संबंध असतात. संगीत व नृत्याचा पुष्कळ नाटकीय उपयोग, सूत्रधार तसेच नृत्याचा खूप नाटकी उपयोग आणि सूत्रधार तसेच बाकीच्या अवास्तववादी विधीतून नाट्यप्रक्रियेवर टिप्पणी होते.

 या सगळ्या गोष्टींचा मोठ्या कौशल्याने आजचे रंगकर्मी उपयोग करू शकतात. त्यासाठी परकीय आविष्कारांकडे बघण्याची गरज नाही. यातूनच नाट्य लेखनाची सुद्धा नवीन दिशा निर्माण होऊ शकते आणि गोमंतकीय रंगभूमी सबळ होऊ शकते.

 गोमंतकीय कोंकणी रंगभूमीवर असे दिशादर्शविणारे स्तुत्य लेखन प्रयोग पुंडलिक नायक, विनायक खेडेकर, दत्ताराम बांबोळकर, प्रकाश वझरेकर, अविनाश च्यारी, विष्णू वाघ, जयंती नायक, प्रसाद लोलयेकर आदि नाट्य  लेखकांनी केलेले आहे. ' शबै शबै', 'भौजन समाज', 'चैतन्याक मठ ना' ही पुंडलिक नायकांची नाटके. 'कानी कानी कोनवा', 'काणी' ही खेडेकरांची नाटके, जयंती नायक यांचे 'कुमकमादेवीची दीप माळ', अविनाश चारी यांचे 'काणी एके काणयेची', दत्ताराम बांबोळकरांचे 'महिरावण' ही नाटके लोकनाट्य शैलीचा उपयोग करून प्रभावीरीतीने कोंकणी रंगभूमीवर मंचित केलेली आहेत.

 भारतातली बहुतेक सगळी लोकनाट्य धार्मिक व मंदिर संस्कृतीशी कमी जास्त प्रमाणात संबंधित असतात. एक धार्मिक विधी व कर्तव्य म्हणून पूर्वी लोकनाट्य सादर व्हायचे. धार्मिक जीवनाचाच तो घटक होता.

 मूळ लोकनाट्यात लिखित संवाद नसत. पात्रे उत्स्फूर्तपणे संवाद बोलायचे. आधुनिक लोकशैली नाट्यकृतीत लिखित संवादांचा वापर होतोय. तरी काळाप्रमाणे पात्रांच्या उत्स्फूर्त अभिनयाचा त्यात भरणा असतोच. बहुतेक वेळा प्रेक्षक सुद्धा सहभागी होतात आणि पात्रे अभिनयातून त्यांच्याकडे संवाद साधतात. अभिनयात संगीत नृत्याचा उपयोग होतोय. लोकशैलीतली ही नाटके तीन व चारही बाजूंनी प्रेक्षक बसलेले असताना जितकी रंगतात तितकी आधुनिक पाश्चात्य शैलीच्या 'बॉक्स' रंगमंचावर रंगत नाहीत. लोकनाट्याच्या तंत्राचा व तत्त्वांचा उपयोग करून बरीच नाटके आज लिहिली जातात आणि त्या प्रयत्नांतून खरे भारतीय नाट्यप्रकार अस्तित्वात येतात.

भारतीय नाटकांची उत्पत्ती सांगताना भरतमूनी सांगतात, 'मनूच्या दुसऱ्या युगात लोक दुःखी-कष्टी झाले होते तेव्हा इंद्रदेवाने ब्रम्हदेवाला सगळ्या थरातल्या, सगळ्या जाती-जमातीतल्या लोकांना मनोरंजनाचे एक साधन निर्माण करण्याची विनंती केली. नंतर ब्रम्हदेवाने ऋग्वेदातून संवाद, सामवेदातून नृत्य, यजुर्वेदातून कथा व अथर्ववेदातून रस घेतला आणि सगळ्या ….चा हा पाचवा वेद निर्माण केला. हा वेद एकाच वेळी पाहण्याचा व ऐकण्याचा आनंद देणारा असतो. भारतीय नाटकाची उत्पत्ती ही अशी होय!

ऋग्वेदातून संवाद, सामवेदातून गीत, यजुर्वेदांतून अभिनय व अथर्ववेदातून रस घेतला आणि सगळ्या वर्णाकरीता हा पाचवा वेद निर्माण केला. हा वेद एकाचवेळी पाहण्याचा व ऐकण्याचा आनंद देणारा आहे. भारतीय नाटकाची उत्पत्ती ही अशी होय. 

भारतीय आदीनाटक दैतविनाशांतून जन्माला आले. “इंद्रध्वज” महोत्सवात भरतमुनींना नाट्यप्रयोग करण्याची विनंती केली. तेव्हा “त्रिपुरदाह” नाटकात देवांनी दानवांकडे युद्ध करुन कितीतरी असूरांना मारुन टाकले. त्यांचा नायनाट करुन जो विजय प्राप्त केला त्याचेच अनुकिर्तन भरतमुनींनी सगळ्या देवांसमोर करुन दाखविले. 

भारतीय संस्कृतीत असूर म्हणजे अशुभ, अनिष्ट, दुष्ट आणि सूर म्हणजे शूभ थोडक्यात सत्य. सत्य-असत्याचा, चांगल्या-वाईटाचा संघर्ष असा सनातन आहे. 

भरतमुनींच्या नाटकाच्या व्याख्येत अवस्थानुकृतिनाट्यम् असे शब्द आहेत. 

व्यक्तीच्या आतल्याबाहेरच्या आत्म्यासकट आणि शरीरासकट आणि अवस्थानुकृती असा व्यापक अर्थ आहे. आणि तरीसुद्धा भारतीय नाटकाच्या व्याख्येत अवस्थाकृती असा व्यापक अर्थ आहे. भारतीय नाटकाच्या दृष्टीने अनुकृती म्हणजे नक्कल नव्हे. तर कुठल्याही अवस्थाकृतीच्याजवळ समांतर असे सृजन-एक कृती.