अडवलपाल -डिचोलीचा गौरीश गावकर द्वितीय, बोर्डे-डिचोलीची क्रिशा फातर्पेकरला तृतीय क्रमांक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील एकमेव वार्षिक बालसाहित्य विशेषांक असलेल्या ‘हुप्पा हुय्या’ या दै. गोवन वार्ताच्या चौथ्या आवृत्तीचे निमित्त साधून आयोजित बालचित्रकला महास्पर्धेत सेंट अॅन्स स्कूल, अागाळी-मडगावची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी अालिया कालिदास गावकर हिने ११,००० रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. सरकारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, अडवलपाल-डिचोलीचा चौथीचा विद्यार्थी गौरीश राजन गावकर याने ८,००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक, तर सरकारी प्राथमिक स्कूल, बोर्डे-डिचोलीची चौथीची विद्यार्थिनी क्रिशा नरेश फातर्पेकर हिने ५,००० रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले. याशिवाय या स्पर्धेत १२ तालुक्यांतील १२ विजेत्या विद्यार्थ्यांना २,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसासह चषक आणि प्रमाणपत्र, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या चित्रकला महास्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २००हून अधिक मुलांनी या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली. रदिमा जोगळे, वृषाली मेथा आणि नारायण पिसुर्लेकर यांनी परीक्षण करून विजेत्यांची निवड केली.
बुधवारी बक्षीस वितरण सोहळा
‘हुप्पा हुय्या’ या गोव्यातील एकमेव बाल साहित्य वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन तथा चित्रकला महास्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पणजीतील गोवा चेंबर ऑफ कॉमर्स हॉल येथे दुपारी ३.१५ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. विशेष निमंत्रित म्हणून शिक्षण संचालक शैलश झिंगडे आणि गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत उपस्थित राहणार आहेत.

१२ तालुक्यांतील १२ विजेते
मुरगाव : दिशा दामोदर गावस, इयत्ता चौथी, दीपविहार प्रायमरी स्कूल, न्यू वाडा - वास्काे
काणकोण : दुर्वा दुर्गेश दैकर, इयत्ता पहिली, जीपीएस अामोणे पैंगीण - काणकोण
सांगे : नैतिक नितेंद्र अावलकर, इयत्ता तिसरी, सरकारी प्राथमिक विद्यालय नायकिणी, भाटी-सांगे
डिचोली : साईशा सोमनाथ पालकर, इयत्ता चौथी, श्री विष्ठल रखुमाई स. प्रा. वि. विठ्ठलापूर साखळी.
धारबांदोडा : मनोहर रामचंद्र पाटील, इयत्ता चौथी, जी.पी.एस. गावठण, पिळये-धारबांदोडा
पेडणे : सान्वी संजय सावंत, इयत्ता चौथी, स. प्रा. विद्यालय, हणखणे-पेडणे
सत्तरी : तश्क शशिकांत शिलकर, इयत्ता तिसरी, सरकारी प्राथमिक शाळा, खोडये-सत्तरी
केपे : नीरज नागेश पाटील, इयत्ता तिसरी, सरकारी प्राथमिक शाळा, कुंभारवाडा-शिरवई, केपे
तिसवाडी : सिद्धार्थ समीर होमखंडे, इयत्ता चौथी, मुष्टिफंड संस्था, श्री महालक्ष्मी प्राथमिक शाळा, पणजी
सासष्टी : अवनी प्रवीण नाईक, इयत्ता दुसरी, विद्याभुवन कोकणी शाळा, मडगाव
बार्देश : स्वरा नाईक, इयत्ता चौथी, डाॅ. के. ब. हेडगेवार प्राथमिक विद्यालय, अस्नोडा
फोंडा : श्रितिक नीलेश पेडणेकर, इयत्ता चौथी, भूमिका डे बोर्डिंग स्कूल, खांडोळा-माशेल