आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या तयारीला वेग

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार असल्याने आणखी चार दिवसांनी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. १३ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आरक्षणही जाहीर झाले. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणत्या उमेदवारासाठी राखीव आहे, हे स्पष्ट झाल्याने उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. आचारसंहिता लागू होत असताना अर्ज भरण्याची तारीख, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची तारीख असा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आरक्षणाची अधिसूचना जारी झाल्याने उमेदवारांच्या निवड प्रक्रियेक गती आली आहे. इच्छुकांकडून तयारी सुरू असतानाच आरक्षण जाहीर झाल्यामुळे उमेदवारीवर दावा करणे सुरू झाले आहे. जे मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत, त्या मतदारसंघात सध्याच्या सदस्यांच्या पत्नीच उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.