पोलीस महिला कबड्डी स्पर्धा २०२३चे आयआरबीएन संघाला अजिंक्यपद


28th January 2023, 10:53 pm
पोलीस महिला कबड्डी स्पर्धा २०२३चे आयआरबीएन संघाला अजिंक्यपद

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : पहिल्या आंतर युनिट/ डिव्हिजन गोवा पोलीस महिला कबड्डी स्पर्धा २०२३चे अजिंक्यपद आयआरबीएन संघाने पटकावले. स्पर्धेचे आयोजन गोवा पोलीसांच्या क्रीडा विभागातर्फे करण्यात आले होते.            

अंतिम सामना आयआरबीएन व एसडीपीओ व पीएचक्यू पणजी या संघात खेळवण्यात आला होता. अंतिम सामना आयआरबीएनने ३०-२३ अशा गुणफरकाने जिंकला.            

अंतिम सामन्याला पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कै. सौ. वासंती विठू गवस चॅरिटेबल ट्रस्ट, ओल्ड गोवाच्या अध्यक्षा नेहा गावस, पोलीस उपमहानिरीक्षक बॉस्को जॉर्ज, शैलेश गावस हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी स्वागत केले.             

सांघिक चॅम्पियनशिप ट्रॉफीसह वैयक्तिक चषक, विजेता संघ, उपविजेता आणि उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांना देण्यात आले. यात आयआरबीएनची सर्वोत्कृष्ट रेडर मीरा, एसडीपीओ पणजीची सर्वोत्कृष्ट बचावपटू सोनाली, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अंकिता आणि ज्येष्ठ खेळाडू लालन खांडेपारकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.            

पहिली आंतर युनिट/विभाग गोवा पोलीस महिला कबड्डी स्पर्धा २०२३ गोवा पोलीस स्पोर्ट्स सेलद्वारे आयोजित करण्यात आली होती आणि नेहा गावस (कै. सौ. वासंती विठू गवस चॅरिटेबल ट्रस्ट, ओल्ड गोवा यांच्या अध्यक्ष) यांनी प्रायोजित केली होती.