राहुल-अथिया लग्नबंधनात


24th January 2023, 12:05 am
राहुल-अथिया लग्नबंधनात

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 

दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका, मार्गदर्शक गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज वरुण आरोन यांनी केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याचबरोबर न्यूझीलंड मालिकेमुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे क्रिकेटपटू लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत.