साकोर्डा बाराभूमी विद्यालयाला अजिंक्यपद

|
01st December 2022, 11:16 Hrs
साकोर्डा बाराभूमी विद्यालयाला अजिंक्यपद

वार्ताहर। गोवन वार्ता

धारबांदोडा : क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाद्वारे आयोजित धारबांदोडा तालुका पातळीवरील माध्यमिक विद्यार्थ्यांसाठीच्या व्हाॅलिबाॅल स्पर्धेत साकोर्डा येथील बाराभूमी विद्यालयाने यश मिळवले. १४ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या गटाने तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत या विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलांच्या गटाने तृतीय स्थान पटकावले आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटाने अंतिम फेरीत सावरगाळ-दाभाळ येथील सोमनाथ हायस्कूलचा पराभव करून विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील मुलींच्याही गटाने अंतिम सामन्यात कुळे येथील अवर लेडी हायस्कूलचा पराभव करून विजय संपादन केला. सतरा वर्षांखालील मुलींच्या गटाने शेवटच्या सामन्यात गोमंतक विद्यालय-पिळये यांच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवून विजय संपादन केला.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटाने एस.ई.एस. नवे साकोर्डा हायस्कूलचा पराभव करून तृतीय स्थान पटकावले. शारीरिक शिक्षक दीप्तेश नाईक व प्रतीक देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.