दुचाकीच्या चोरी प्रकरणी हणजूणमध्ये एकाला अटक

हणजूण पोलिसांची कारवाई

|
30th September 2022, 12:19 Hrs
दुचाकीच्या चोरी प्रकरणी  हणजूणमध्ये एकाला अटक

 प्रतिनिधी। गोवन वार्ता             

म्हापसा  :  वागातोर येथील मँगो ट्री येथे पार्क केलेल्या दुचाकीच्या चोरी प्रकरणी संशयित डॅनिएल दास आवेरो (रा. केरळ) याला हणजूण पोलिसांनी अटक केली.             

ही चोरीची घटना दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २.१५ च्या दरम्यान घडली होती. फिर्यादी परशुराम पाटील (रा. घाटेश्वरनगर, म्हापसा) यांनी पार्क केलेली   जीए ०३ डब्लू १६२४ ही रेंट अ बाईट दुचाकी चोरीस गेली होती. पोलीस हवालदार डी. एच. गवंडी, कॉन्स्टेबल महेंद्र मांद्रेकर व रूपेश आजगावकर या पथकाने गुरुवारी सदर दुचाकीचा शोध घेतला. संशयिताला ताब्यात घेऊन चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली.