भक्तीचे गोव्यात जल्लोषात स्वागत


13th August 2022, 02:50 am
भक्तीचे गोव्यात जल्लोषात स्वागत

पणजी : महाबलीपूरम चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्यपदक पटकावलेल्या भारतीय संघातील सदस्य आयएम भक्ती कुलकर्णीचे गोव्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ संघटनेशी संलग्न विविध अधिकारी उपस्थित होते.

भक्तीच्या स्वागतासाठी युवा आणि क्रीडा प्राधिकरणाचे (डीएसवायए) शारीरिक शिक्षक उत्तर गोवा उपसंचालक  जेनिफर फेर्राव ई गोन्साल्विस, प्रशिक्षक सहाय्याक संचालक आर्यविन कार्दोज, गोवा चेस असोसिएशनचे सचिव शरेंद्र नाईक, खजिनदार किशोर बांदेकर, उपाध्यक्ष सत्यवान हरमलकर, सहसचिव अरविंद म्हामल व दामोदर जांबावलीकर, सहकारी सदस्य बाळकृष्ण व अमृत नाईक, एसएजी बुद्धिबळ प्रशिक्षक संजय कवळेकर आणि स्वप्नील होबळे, मुरगाव तालुका चेस असोसिएशनचे अधिकारी, सासष्टी तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष आशिष केणी, सचिव सुनलि बाळ्ळीकर, खजिनदार दिलीप वेर्णेकर, तिसवाडी तालुका अध्यक्ष महेश कांदोळकर, क्वीनन्स चेस क्लब बांबोळीचे अधिकारी, सदस्य, पालक व नातेवाईक उपस्थित होते.

गोवा चेस असोसिएशनचे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी ४४ व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये पदक मिळवल्याबद्दल भक्तीचे अभिनंदन केले.

गोव्याच्या बुद्धिबळपटूची ही एक मोठी कामगिरी आहे. भक्तीने वयाच्या अडीच वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आणि आज तिने संघातील सहकाऱ्यांसोबत चांगली कामगिरी करून ही पातळी गाठली आहे, असे सांगून क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी सर्वोत्तम कामगिरीबद्दल भक्तीचे अभिनंदन केले.