प्रियंका वाड्रा यांना पोलिसांनी फरफट नेले!

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; राहुल यांच्यासह अनेक नेते ताब्यात

|
05th August 2022, 11:36 Hrs
प्रियंका वाड्रा यांना पोलिसांनी फरफट नेले!

नवी दिल्ली : महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसने शुक्रवारी देशव्यापी आंदोलन छेडले. याअंतर्गत काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र, हा मोर्चा रोखत पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका वाड्रा यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी प्रियंका यांना फरफटत नेल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घातल केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला आहे. जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे. मात्र, पोलिसांकडून काँग्रेस काही खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना मारहाणही करण्यात आला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत काढलेला मोर्चा पोलिसांनी रोखत त्यांना ताब्यात घेतले आहे.
विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढे मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो. हे लोक २४ तास खोटे बोलण्याचे काम करतात. त्यांना महागाई आणि बेरोजगारीबाबत दिलेल्या आश्वसानाचीही भीती वाटते, असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.